शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

वन नेशन वन इलेक्शनवरुन भाजपाचा यू-टर्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 17:00 IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित घेण्याचा विचार नसल्याचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली: वन नेशन वन इलेक्शनसाठी विधी आयोगाला पत्र लिहिणाऱ्या भाजपानं आता यू-टर्न घेतला आहे. एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्याचा आमचा विचार नाही, असं भाजपाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. आम्ही एक देश आणि एक निवडणुकीची मागणीच केलेली नाही, असं म्हणत भाजपानं यावरुन सुरू असलेल्या चर्चांचं खंडन केलं आहे. 

विशेष म्हणजे खुद्द भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी 'वन नेशन वन इलेक्शन'च्या मुद्दावरुन विधी आयोगाला पत्र लिहिलं होतं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेतल्यास पैशांची बचत होईल. याशिवाय प्रशासनावरील ताणदेखील कमी होईल, असं शहांनी पत्रात म्हटलं होतं. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसोबत ११ राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही घेतल्या जाऊ शकतात आणि त्यात महाराष्ट्राचाही समावेश असेल, असं वृत्त काल चर्चेत होतं. भाजपाकडून अनेकदा 'वन नेशन वन इलेक्शन'ची भूमिका मांडण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभेसह 11 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. अमित शहांनी विधी आयोगाला पत्र लिहिल्यानंतर ही चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे आज भाजपानं स्पष्टीकरण दिलं. 'लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकाचवेळी घेण्याचा आमचा विचार नाही. आम्ही तशी मागणीदेखील केलेली नाही,' अशा शब्दांमध्ये भाजपानं वन नेशन वन इलेक्शनवर सुरू असलेल्या चर्चेचं खंडन केलं आहे. एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होणं शक्य नसल्याचं आज सकाळीच निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं. त्यानंतर आता भाजपानं याबद्दल स्पष्टीकरण देत लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेण्याचा विचार नसल्याचं म्हणत या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Electionनिवडणूकvidhan sabhaविधानसभाlok sabhaलोकसभाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी