भाजपाच्या ऑफरला केराची टोपली! अभिनेता विजयचा युती करण्यास स्पष्ट नकार; TVK स्वबळावर लढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 14:31 IST2026-03-19T14:29:28+5:302026-03-19T14:31:19+5:30

Actor Vijay TVK News: एका पक्षाने विजय यांच्या पक्षाला ९० जागा आणि मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचे म्हटले जात आहे.

bjp offer rejected actor vijay clear refusal to form an alliance will TVK contest on its own in tamil nadu assembly election 2026 | भाजपाच्या ऑफरला केराची टोपली! अभिनेता विजयचा युती करण्यास स्पष्ट नकार; TVK स्वबळावर लढणार?

भाजपाच्या ऑफरला केराची टोपली! अभिनेता विजयचा युती करण्यास स्पष्ट नकार; TVK स्वबळावर लढणार?

Actor Vijay TVK News: देशात पुन्हा एकदा निवडणुकांची धामधूम सुरू होणार आहे. भारतीय निवडणूक आयोग पाच महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या निवडणुकीपूर्वी राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांकडून आघाड्यांचे गणित जुळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विजय यांच्या टीव्हीके पक्षाला एनडीएमध्ये आणण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु, अभिनेता विजयचा पक्ष भाजपाशी युती करण्यास तयार नसल्याचे म्हटले जात आहे. भाजपाने दिलेली दिलेली ऑफर विजयला मान्य नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

तामिळनाडू विधानसभा निवडणुका जवळ येत असताना, राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, अभिनेता-राजकारणी विजय यांच्या पक्ष, तमिलगा वेट्टी कझगम (टीव्हीके) आणि भाजपा यांच्यातील युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. भाजपाने विजय यांना युतीत सामील होण्यासाठी एक महत्त्वाची ऑफर दिली आहे. भाजपाने विजय यांच्या पक्षाला ८० जागा देऊ केल्या आहेत. याशिवाय, भाजपाने विजय यांना उपमुख्यमंत्री बनवण्याचा प्रस्ताव दिला आहे. परंतु, काही रिपोर्टनुसार, विजय यांना मुख्यमंत्रीपद हवे आहे आणि यामुळे चर्चेत अडथळे निर्माण होत आहेत. यानंतर आता विजयने स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

कोणत्याही राजकीय पक्षासोबत युती करणार नाहीत

थलपथी विजय यांचा पक्ष तमिलगा वेट्टी कझगम (टीव्हीके), तमिळनाडू विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे म्हटले जात आहे. टीव्हीकेने आता स्पष्टपणे सांगितले आहे की, ते कोणत्याही राजकीय पक्षासोबत युती करणार नाहीत. अभिनेते-राजकारणी विजय यांनीही या अफवांना खोटा प्रचार संबोधून फेटाळून लावले आहे. परंतु, टीव्हीके नेते आधव अर्जुन यांनीही एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव नाकारल्याचा दावा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रस्तावात विजय यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा समावेश होता. तसेच टीव्हीके भाजपसोबत एनडीए आघाडीचा भाग होऊ शकते, या जोरदार अफवांना स्वतः विजय यांनी फेटाळून लावले.

दरम्यान, तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीव्हीकेने असा दावा केला की, एका पक्षाकडून विजय यांना मुख्यमंत्रीपद आणि ९० जागा देऊ केल्या आहेत. टीव्हीके नेते अधव अर्जुन यांनी प्रस्ताव देणाऱ्या पक्षाचे नाव सांगितले नाही. विजयने हा प्रस्ताव नाकारला आहे. त्यांनी आम्हाला ५० ते ९० जागांपर्यंत सर्व प्रकारचे प्रस्ताव दिले. पण विजयने फक्त एवढेच सांगितले की त्याला पद नव्हे, तर लोकांचा विश्वास हवा आहे, असे टीव्हीके नेते म्हणाले.

 

Web Title : अभिनेता विजय ने भाजपा का गठबंधन प्रस्ताव ठुकराया; TVK अकेले लड़ेगा?

Web Summary : अभिनेता विजय की TVK पार्टी ने तमिलनाडु चुनाव के लिए भाजपा का गठबंधन प्रस्ताव अस्वीकार कर दिया। उपमुख्यमंत्री पद और 80 सीटों के प्रस्ताव के बावजूद, विजय ने स्वतंत्र रूप से चुनाव लड़ने का लक्ष्य रखा है, पदों के बजाय सार्वजनिक विश्वास को प्राथमिकता दी, संभवतः सभी सीटों पर अकेले चुनाव लड़ेंगे।

Web Title : Actor Vijay Rejects BJP Alliance Offer; TVK to Fight Alone?

Web Summary : Actor Vijay's TVK party declined BJP's alliance offer for Tamil Nadu elections. Despite offers including deputy chief ministership and 80 seats, Vijay aims to contest independently, prioritizing public trust over positions, potentially contesting all seats alone.