शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा खासदाराचे वादग्रस्त विधान

By admin | Updated: September 15, 2014 03:48 IST

मदरशांमध्ये दहशतवादाचे शिक्षण दिले जाते,’ असा आरोप करून भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा एका नव्या वादाला जन्म दिला आहे

लखनौ : ‘मदरशांमध्ये दहशतवादाचे शिक्षण दिले जाते,’ असा आरोप करून भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा एका नव्या वादाला जन्म दिला आहे. साक्षी महाराजांच्या या विधानावर अन्य राजकीय पक्षांनी जोरदार टीका केली. भाजपा खोट्या गोष्टींचा प्रचार करून सांप्रदायिक ध्रुवीकरण निर्माण करीत असल्याचा आरोप या पक्षांनी केला आहे.‘मदरशांमधून दहशतवादाचे शिक्षण दिले जात आहे. ते (मदरसे) त्यांना दहशतवादी आणि जिहादी बनवीत आहेत. हे काही राष्ट्राच्या हिताचे नाही,’ असे उन्नावचे भाजपा खासदार साक्षी महाराज म्हणाले. कनौज जिल्ह्याच्या नादेमऊ येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना धार्मिक शाळांमधून राष्ट्रवादाचे शिक्षण दिले जात नाही. असा एक मदरसा मला दाखवा की जेथे १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारीला तिरंगा फडकविला जातो. राष्ट्रवादाशी काही देणेघेणे नसणाऱ्या मदरशांना सरकारी मदत दिली जात आहे. आमच्या बहुतांश शाळांना मात्र कोणतीही मदत मिळत नाही. पण या मदरशांना मात्र मदत मिळते.’समाजवादी पार्टीने साक्षी महाराजांच्या या वक्तव्यावर सडकून टीका केली. हे वक्तव्य द्वेषपूर्ण आणि समाजात फूट पाडणारे आहे, असे सपाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी म्हणाले. तर धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा आणि देशाला दुसरा पाकिस्तान बनविण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे, असा आरोप काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी केला. साक्षी महाराजांनी मदरशांमधून दहशतवादाचे शिक्षण दिले जाते याचे पुरावे दिले पाहिजे. रा. स्व. संघ आणि परिवारातर्फे अशाच खोट्या गोष्टी पसरविण्यात येत आहेत, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)