शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शक्तीमान घोडयाला मारहाण करणा-या भाजप आमदाराला अटक

By admin | Updated: March 18, 2016 09:39 IST

सुरी येथे भाजपच्या आंदोलना दरम्यान शक्तीमान या घोडयाला अमानुष मारहाण करणारा भाजप आमदार गणेश जोशीला डेहराडून येथे पोलिसांनी अटक केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

डेहारडून, दि. १८ - मसुरी येथे भाजपच्या आंदोलना दरम्यान शक्तीमान या घोडयाला अमानुष मारहाण करणारा भाजप आमदार गणेश जोशीला डेहराडून येथे पोलिसांनी अटक केली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत यांनी फंडाचा गैरवापर केल्याचा आरोप करत दोन-तीन दिवसांपूर्वी गणेश जोशीने समर्थकांसह आंदोलन केले होते. 
यावेळी आंदोलकांना रोखण्यासाठी घोडयावरुन आलेल्या पोलिसांवर जोशी व त्याच्या समर्थकांनी हल्ला चढवला, त्याचवेळी जोशींनी शक्तीमान घोड्यावरही हल्ला केला. 
त्यांनी सुरवातीला घोड्याच्या तोंडावर दांडुका मारला, त्यांनतर त्याच्या पायावर प्रहार केल्याने घोडा खाली कोसळला. गणेश जोशींनी केलेल्या अमानुष मारहाणीत शक्तीमानला आपला पाय गमवावा लागला. 
गुरुवारी डॉक्टरांनी शक्तीमानच्या पायावर शस्त्रक्रिया करुन त्याला तात्पुरता कुत्रिम पाय बसवला आहे. शक्तीमान आता स्वत:च्या पायावर उभा राहू शकला असला तरी, लवकरच त्याला कायमस्वरुपी कुत्रिम पाय बसवणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शक्तीमान १४ वर्षांचा आहे.