उत्तर प्रदेशात भाजपा नेत्याची गोळ्या झाडून हत्या, तीन जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 07:35 AM2020-10-18T07:35:02+5:302020-10-18T07:37:20+5:30

वरिष्ठ पोलीस अधीक्षक सचिंद्र पटेल यांनी सांगितले की, गुप्ता यांच्या हत्येप्रकरणी वीरेश तोमर व अन्य दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (BJP)

BJP leader shot dead in Uttar Pradesh three arrested | उत्तर प्रदेशात भाजपा नेत्याची गोळ्या झाडून हत्या, तीन जण ताब्यात

उत्तर प्रदेशात भाजपा नेत्याची गोळ्या झाडून हत्या, तीन जण ताब्यात

Next
ठळक मुद्देभाजप नेते डी. के. गुप्ता यांची गोळ्या झाडून हत्या याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.  गुप्ता यांच्या हत्येप्रकरणी वीरेश तोमर व अन्य दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिरोजाबाद :उत्तर प्रदेशात फिरोजाबादच्या टुंडलामध्ये दुचाकीवर आलेल्या तीन जणांनी भाजप नेते डी. के. गुप्ता यांची गोळ्या झाडून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. 

वरिष्ठ पोलीस अधीक्षक सचिंद्र पटेल यांनी सांगितले की, गुप्ता यांच्या हत्येप्रकरणी वीरेश तोमर व अन्य दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोमरसह अन्य दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, या लोकांमध्ये काही वाद सुरू होता. फेसबुकवरही याबाबत पोस्ट टाकण्यात आली होती. या घटनेनंतर स्थानिक भाजप नेत्यांनी संताप व्यक्त करीत रस्ता रोको केला आणि पोलीस प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी केली. 

Web Title: BJP leader shot dead in Uttar Pradesh three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.