शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या तस्करीप्रकरणी भाजपा नेत्याला अटक

By admin | Updated: March 1, 2017 13:28 IST

लहान मुलांच्या तस्करीप्रकरणी पश्चिम बंगालच्या भाजपा नेत्या जुही चौधरी यांना सीआयडीने भारत - नेपाळ सीमारेषेवरुन अटक आहे.

ऑनलाइन लोकमतपश्चिम बंगाल, दि. 1 - लहान मुलांच्या तस्करीप्रकरणी पश्चिम बंगालच्या भाजपा नेत्या जुही चौधरी यांना सीआयडीने भारत - नेपाळ सीमारेषेवरुन अटक आहे. मंगळवारी रात्री उशीरा सीआयडीच्या पथकाने खारीवाडी पोसिल स्थानकाच्या परिसरात जुही चौधरींना अटक केली. जुहीच्या अटकेसाठी तृणमूलच्या युवक विद्यार्थी संघटनेनं अंदोलने केली होती. जुहीचे वडिल रविंद्र चौधरी भाजपाचे पश्चिम बंगाल राज्याचे सचिव आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, यापुर्वी लहान मुलांच्या तस्करीप्रकरणी चंदना चक्रवर्तीने भाजपा नेत्या रुपा गांगुली, कैलाश विजयवर्गीय आणि जूही चौधरी यांचे नाव घेतले होते. 18 फेब्रुवारी रोजी सीआयडीने विमला शिशूगृहाच्या संचालिका चंदना चक्रवर्ती यांना अटक केली होती, त्यांना सहअरोपी म्हणून अटक करण्यात आल्याचे प्रथमिक वृत्त आहे.

सीआयडीने या प्रकरणी आतापर्यंत चार लोकांना अटक केली आहे. नवजात बालक आणि लहान मुलांची सीमेवर तस्करी करण्याचा या चौघांवर आरोप आहे. यामध्ये विमला शिशु गृहाच्या मुख्य दत्तक अधिकारी सोनाली मोंडल, अध्यक्षा चंदना चक्रवर्ती आणि त्यांचे भाऊ मानस भौमिक यांचा समावेश आहे. या तिघांवर 1 ते14 वयोगटाच्या 17 मुलांना विदेशात विकल्याचा आरोप आहे. आपले काम कायदेशीरित्या योग्य ठरवण्यासाठी त्यांनी या मुलांच्या आई-वडिलांनी दुसऱ्यांना दत्तक देण्यासाठी आपल्याकडे सोपवल्याचे नोंद केले आहे. ही सर्व प्रक्रिया त्यांनी कायदेशीरपणे केली आहे.