उद्धव ठाकरे 'पुत्रमोह झालेले धृतराष्ट्र'; भाजपाच्या बड्या नेत्याचा निशाणा, संजय राऊतांना दिला असा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 05:22 PM2020-08-20T17:22:25+5:302020-08-20T17:22:50+5:30

सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून देशातील राजकारण जबरदस्त तापू लागले आहे. शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी 'संजय उवाच', असे शीर्षक देत आज एक ट्विट केले. त्यांच्या या ट्विटला भाजपा नेत्याने उत्तर देत इशारा दिला आहे.

bjp leader and sopkesperson sambit patra reply to mp sanjay raut and criticizes uddhav thackeray | उद्धव ठाकरे 'पुत्रमोह झालेले धृतराष्ट्र'; भाजपाच्या बड्या नेत्याचा निशाणा, संजय राऊतांना दिला असा इशारा

उद्धव ठाकरे 'पुत्रमोह झालेले धृतराष्ट्र'; भाजपाच्या बड्या नेत्याचा निशाणा, संजय राऊतांना दिला असा इशारा

Next

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला आहे. यानंतर आता देशातील राजकारण जबरदस्त तापू लागले आहे. शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी 'संजय उवाच', असे शीर्षक देत आज एक ट्विट केले. त्यांच्या या ट्विटला भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी 'कृष्ण उवाच' म्हणत उत्तर दिले आहे. या ट्विटमध्ये संबित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांचा उल्लेख 'पुत्रमोह झालेले धृतराष्ट्र', असा केला आहे. तसेच याच पुत्र मोहात ते 'इंद्रप्रस्थ' गमावतील, असा इशाराही दिला आहे.

खासदार संजय राऊत यांनी 'संजय उवाच' म्हणत, ट्विट केले होते, की "उनसे कहना की.. किस्मत पे इतना नाज ना करे.. हमने बारिशों में भी जलते हुए मकान देखे है". यानंतर त्यांनी जय महाराष्ट्र, असे लिहिले होते. राऊतांच्या या ट्विटवर भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी पलटवार करत आणि कृष्ण उवाच म्हणत, 'हे संजय: क्योंकि मैने आपको दिव्य चक्षु प्रदान किया है, जरा अपने समीप बैठे धृतराष्ट्र से कहिए की पुत्र मोह में वे इंद्रप्रस्थ गवाने जा रहे हैं. 

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सुरुवातीपासूनच मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. सुशांतच्या कुटुंबीयांनीही मुंबई पोलिसांच्या तपासावर अविश्वास दाखवत बिहार पोलिसांत तक्रार दिल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आली. यानंतर महाराष्ट्र पोलीस आणि बिहार पोलीसही समोरासमोर आले होते. मुंबई पोलिसांनी तब्बल दोन महिने एफआयआर न नोंदवल्यावरही प्रश्न चिन्ह उपस्थित झाले होते. या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचेही नाव चर्चेत आले. यानंतर संजय राऊत, सरकार आणि पोलीस यांच्या समर्थनार्थ उभे ठाकलेले दिसून आले.

दोस्तो जल्दी ही सुनेंगे महाराष्ट्र सरकार जा 'रिया' हैं -
मात्र, या प्रकरणावरून भाजपा प्रवक्ते संबित पात्राही सक्रिय झाले आहेत. त्यांनी बुधवारीही एक अशाच प्रकारचे ट्विट करत महाराष्ट्रातील आघाडी सरकार लवकरच कोसळल्याचे ऐकायला मिळेल, असे म्हटले होते. संबित यांनी ट्विट केले होते, की, 'पहले महाराष्ट्र सरकार सो'रिया' था, फिर संजय राऊत सुशांत परिवार को धो 'रिया' था, अब मुंबई में सरकार रो 'रिया' हैं, दोस्तो जल्दी ही सुनेंगे महाराष्ट्र सरकार जा 'रिया' हैं. #महाराष्ट्रसरकार_रो_रिया_हैं.'

महत्त्वाच्या बातम्या -

सुशांत सिंह प्रकरण: SCच्या निर्णयानंतर धावपळ वाढली, पोलीस आयुक्त मुख्यमंत्र्यांनंतर गृहमंत्र्यांच्या भेटीला

CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!

15 ऑगस्टला पंतप्रधान मोदींनी लडाखवरून सुनावलं; आता अशी आली चीनची प्रतिक्रिया

CoronaVirus News: लोकांना संक्रमित करण्यासाठी अमेरिका तयार करतोय नवा कोरोना व्हायरस!

CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

Web Title: bjp leader and sopkesperson sambit patra reply to mp sanjay raut and criticizes uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.