तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 12:00 PM2024-05-25T12:00:14+5:302024-05-25T12:03:34+5:30

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या आहेत. आज सहाव्या टप्प्यातील मतदान होत आहे. ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. यापूर्वीच आता राजकीय विश्लेषकांनी चर्चा सुरू केल्या आहेत.

lok sabha election 2024 Prashant Kishor's reaction to Yogendra Yadav's claim of 260 | तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...

तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, आज सहाव्या टप्प्यातील मतदान होत असून ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे.  या पार्श्वभूमीवर राजकीय विश्लेषक आकडेवारीचे दावे करत  आहेत. दरम्यान, निवडणूर रणनितीकार प्रशांत किशोर यांनी योगेंद्र यादव यांच्या अंदाजावर प्रतिक्रिया दिली आहे.  या दोघांनीही भाजपच्या जागांबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत. पण भाजपा मित्रपक्षांच्या मदतीने तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यात यशस्वी होईल, असा दावाही योगेंद्र यादव यांनी केला आहे.

एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 

भाजपला स्वबळावर ३७० जागा जिंकणे अशक्य आहे, असं भाकीत प्रशांत किशोर यांनी केले. भाजपा ४०० पार होणं कठीण असल्याचेही त्यांनी सांगितले.  मात्र, पक्ष २७० च्या खाली राहणार नाही, असे ते म्हणाले. दुसरीकडे, योगेंद्र यादव यांनी एकट्या भाजपला २६० पेक्षा जास्त जागा गाठता येणार नसून ३०० चा आकडा पार करणे अशक्य असल्याचे भाकीत केले. भाजपा  २७५ किंवा २५० जागांपेक्षाही खाली राहू शकतो, असं त्यांच्या सर्वेक्षणाच्या अंदाजात म्हटले आहे. यात योगेंद्र यादव यांनी प्रशांत किशोर यांनी केलेल्या ४०० पार न होण्याचा दाव्याचा पुनरुच्चार केला.

शुक्रवारी २४ मे रोजी प्रशांत किशोर यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर योगेंद्र यादव यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा केलेल्या व्हिडिओचा एक स्क्रीनशॉट शेअर केला होता.यात यादव यांनी भाजप २४० ते २६० जागा जिंकेल आणि एनडीएचे मित्रपक्ष ३५ ते ४५ जागा जिंकतील, असा अंदाज व्यक्त केला होता. योगेंद्र यादव यांनी काँग्रेस ८५ ते १०० जागा जिंकेल, आणि त्याच्या इंडिया ब्लॉक सदस्यांना १२० ते १३५ जागा मिळतील, इंडिया आघाडीला २०५ ते २३५ जागा मिळतील, असं भाकीत त्यांनी केलं होतं. याच व्हिडीओचा स्क्रिनशॉट शेअर करत प्रशांत किशोर यांनी ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, "देशातील निवडणुका आणि सामाजिक-राजकीय समस्या समजून घेणारा एक विश्वासू चेहरा योगेंद्र यादव जी यांनी २०२४ चे त्यांचे अंतिम आकडेवारी शेअर केली आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपला २४०-२६० जागा मिळू शकतात ४, तुम्हाला कळेल की कोण कोणाबद्दल बोलत आहे.

याआधी मंगळवारी २१ मे रोजी एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रशांत किशोर यांनी भाजपच्या जागाबाबत अंदाज वर्तवला आणि ते म्हणाले की पंतप्रधान मोदींविरोधात लोकांमध्ये कोणताही राग नाही. भाजपला उत्तर आणि पश्चिममध्ये कोणताही मोठा धक्का बसत नाही, तर दक्षिण आणि पूर्वमध्ये त्यांच्या जागा वाढतील. 

योगेंद्र यादव यांनी केरळपासून ओडिशापर्यंत मते आणि जागा या दोन्हीमध्ये भाजपला फायदा होईल, असे भाकीत केले. मात्र, भाजपला अपेक्षेइतका फायदा होणार नाही, असे ते म्हणाले. केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये भाजपच्या जागा दोन जागांनी वाढतील, मित्रपक्षांनाही दोन जागा मिळतील. आंध्र प्रदेशात भाजपच्या जागा ३ ने वाढतील, मित्रपक्षांना १२ जागा मिळतील. तेलंगणात भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत झाल्याने दोन्ही पक्षांच्या जागांमध्ये वाढ होणार आहे. भाजप चार जागांनी वाढेल. ओडिशातील भाजपच्या विद्यमान ८ जागांमध्ये आणखी चार जागांची भर पडणार आहे, असंही त्यांनी सांगितले. 

Web Title: lok sabha election 2024 Prashant Kishor's reaction to Yogendra Yadav's claim of 260

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.