Mithun Chakraborty : "जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब..."; मिथुन चक्रवर्ती कडाडले, ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 12:22 IST2026-01-03T12:21:40+5:302026-01-03T12:22:02+5:30
Mithun Chakraborty And Mamata Banerjee : भाजपाचे नेते आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी पश्चिम बंगाल सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Mithun Chakraborty : "जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब..."; मिथुन चक्रवर्ती कडाडले, ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
भाजपाचे नेते आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी पश्चिम बंगाल सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "पश्चिम बंगालला 'पश्चिम बांगलादेश' बनवण्याचे प्रयत्न केले जात आहेत, पण हे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत" असा आरोप त्यांनी केला. तसेच पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यात एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल ममता बॅनर्जी यांनी केलेल्या विधानाचा मिथुन चक्रवर्ती यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, "ममता बॅनर्जींना वाटतं तसा हा कोणताही दुसरा देश नाही. बांकुरा येथील सभेत मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांना धमकी दिली आणि सांगितलं की, त्यांनीच शाह यांना कोलकातातील हॉटेलमधून बाहेर पडू दिलं. त्यांनी स्पष्ट सांगावं की गृहमंत्र्यांना बंगालमध्ये येऊ दिले जाणार नाही, तो दिवस विनाशाचा असेल."
"बंगालमधील घुसखोरी संपवणार, प्रत्येकाला शोधून बाहेर काढणार", अमित शाह कडाडले
"आम्ही संविधानावर विश्वास ठेवतो"
आपल्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाचा संदर्भ देत मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, ज्याप्रमाणे १९९० च्या दशकात काश्मीरमधून पंडितांसोबत झालं होतं, तसेच काहीसे प्रयत्न बंगालमध्येही सुरू आहेत. काहींना वाटत असेल की हा बांगलादेश झाला आहे, पण तो दिवस कधीच येणार नाही. जोपर्यंत मिथुन चक्रवर्तींसारख्या लोकांच्या शरीरात रक्ताचा एक थेंब शिल्लक आहे, तोपर्यंत हे राज्य बांगलादेश होऊ देणार नाही. आम्ही संविधानावर विश्वास ठेवतो.
"I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन
तृणमूल काँग्रेस (TMC) सरकार मुळापासून उखडून टाकण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केलं. त्यांनी काँग्रेस, डावे पक्ष आणि TMC मधील "प्रामाणिक" समर्थकांना आगामी निवडणुकीत सरकार बदलण्यासाठी भाजपासोबत येण्यास सांगितलं. राज्यात उद्योग, नोकऱ्या आणि आरोग्य सुविधांचा अभाव असल्याचा दावा करत त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला. केंद्राची 'आयुष्मान भारत' योजना लागू न केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.