लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: ४५ वर्षीय नितीन नबीन यांची सोमवारी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविराेध निवड झाली. या पदावर विराजमान होणारे ते आतापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत. भाजप आता नव्या आणि अद्याप फारसा प्रभाव नसलेल्या राज्यांमध्ये आपला विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील असताना नबीन यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे. मात्र त्यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याची औपचारिक घोषणा उद्या, मंगळवारी करण्यात येईल.
निवडणूक अधिकारी के. लक्ष्मण यांनी सांगितले की, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नबीन यांच्यासाठी एकूण नामांकन अर्जाचे ३७ संच सादर करण्यात आले. हे सर्व अर्ज वैध ठरले आहेत. नामांकन अर्ज सादर करण्याची सर्व प्रक्रिया सोमवारी दुपारी दोन ते चार या कालावधीत पूर्ण झाली. नामांकन अर्ज परत घेण्याच्या कालावधीनंतर निवडणूक अधिकारी म्हणून मी जाहीर करतो की, राष्ट्रीय अध्यक्षपदी नबीन यांचे एकच नाव प्रस्तावित झाले आहे.
अशी झाली अर्जप्रक्रिया
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीचे रिटर्निंग ऑफिसर के. लक्ष्मण यांच्याकडे नबीन यांनी सोमवारी नामांकन अर्ज सादर केला. त्यानंतर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि अन्य राज्यांतील भाजप नेत्यांनी नबीन यांना पाठिंबा देत दुसरा नामांकन अर्ज दाखल केला. नबीन हे भाजपचे १२वे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याची घोषणा आज, मंगळवारी होणार आहे.
नवी दिल्लीत भाजप मुख्यालयात सोमवारी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नबीन यांच्यासाठी एकूण नामांकन अर्जाचे ३७ संच सादर करण्यात आले. नामांकन अर्जांच्या ३७ संचांपैकी ३६ संच विविध राज्यांतून आले. उरलेला एक संच भाजप संसदीय मंडळाच्या सदस्यांकडून सादर करण्यात आला. त्यात पंतप्रधान आणि ३७ खासदारांचा समावेश होता. याप्रसंगी पक्षाचे विद्यमान अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव आणि किरेन रिजीजू आदी उपस्थित होते.
Web Summary : Nitin Nabin, 45, was elected unopposed as BJP's national president, becoming the youngest to hold the position. His selection is considered crucial for expanding the party in new regions. The formal announcement will be made on Tuesday.
Web Summary : 45 वर्षीय नितिन नबीन भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष निर्विरोध चुने गए, जो इस पद पर सबसे युवा हैं। उनका चयन नए क्षेत्रों में पार्टी के विस्तार के लिए महत्वपूर्ण है। औपचारिक घोषणा मंगलवार को होगी।