शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

५ राज्यांच्या निवडणुका; भाजपने कसली कंबर; राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ठरला अजेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 06:03 IST

कामाला लागण्याच्या दिल्या सूचना

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : पुढील वर्षी हाेणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली आहे. नवी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यात निवडणुकींचा अजेंडा ठरविण्यात आला. निवडणुकीचे मुद्दे आणि रणनीती ठरविण्याच्या दृष्टीने राज्यांचे प्रभारी व कार्यकारिणी सदस्यांसाेबत चर्चा झाली. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीची दिल्लीत बैठक झाली. त्यावेळी ते बाेलत हाेते. पुढील वर्षी पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गाेवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका हाेणार आहेत. त्यासंबंधी राजकीय डावपेच आणि धाेरणांबाबत या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. याशिवाय पदाधिकाऱ्यांसाेबत चर्चा करून पुढील काम महिन्यासाठी पक्षाचा अजेंडा मांडण्यात आला. काेराेना प्रतिबंधक लसीकरणाबाबतही बैठकीत चर्चा झाली. काेराेना महामारीच्या काळात केंद्र सरकारने केलेली चांगली कामे जनतेसमाेर नेण्याच्या सूचनाही नड्डा यांनी बैठकीमध्ये केल्या. माेदी सरकारने गरिबांना माेफत धान्य देण्याशिवाय लसीकरण व अनेक कल्याणकारी याेजनांवर केलेल्या कामाचा दाखलाही नड्डा यांनी बैठकीदरम्यान दिला. पक्षाचे उपाध्यक्ष रमण सिंह, सरचिटणीस बी. एल. संताेश, उत्तर प्रदेशचे प्रभारी आणि उपाध्यक्ष राधामाेहन सिंह, उत्तराखंड आणि पंजाबचे प्रभारी दुश्यंत गाैतम, गाेव्याचे प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, सरचिटणीस विनाेद तावडे यांच्यासह उपाध्यक्ष, सरचिटणीस, राष्ट्रीय प्रवक्ते उपस्थित हाेते. पक्ष मजबुतीवर चर्चा -पंकजा मुंडेबैठकीत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली. याशिवाय पक्ष मजबूत करण्याबाबतही चर्चा झाली. ही बैठक पक्षाच्या रचनेचा भाग असल्याचे कार्यकारिणी सदस्य पंकजा मुंडे यांनी सांगितले. राज्यांचा वेगाने विकास करणार भाजपचे लक्ष्य डबल इंजिन असलेल्या सरकारसोबत राज्यांचा विकास वेगाने करण्याचे आहे. उपाध्यक्ष बी. जे. पांडा म्हणाले. पक्षाचे कोट्यवधी कार्यकर्ते राजकारण हे सामाजिक आणि देशहिताची जबाबदारी या नात्याने करतात, असे नड्डा म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपा