शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शाजिया इल्मीही झाल्या भाजपवासी

By admin | Updated: January 17, 2015 02:44 IST

किरण बेदी यांच्यापाठोपाठ शाजिया इल्मी याही भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत. त्या यापूर्वी अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातील

नवी दिल्ली : किरण बेदी यांच्यापाठोपाठ शाजिया इल्मी याही भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत. त्या यापूर्वी अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातील महत्त्वपूर्ण सदस्य राहिल्या आहेत. त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीच्या तिकिटावर दिल्ली विधानसभा आणि नंतर लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करला होता.दिल्ली विधानसभा निवडणूक लढण्याची माझी इच्छा नसून पक्ष माझ्या भावनेचा आदर करील, अशी आशा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.किरण बेदी यांनी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्याकडे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार म्हणून पाहिले जात आहे. भाजपाचे सदस्यत्व स्वीकारल्यानेतर शाजिया म्हणाल्या की, विधानसभा व त्यानंतर लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करल्याने माझी निवडणूक रिंगणात उतरण्याची इच्छा नाही. मी जनतेची सेवा करणार. पक्षाच्या आदेशाचे पालन करीन. निवडणूक न लढण्याच्या माझ्या इच्छेचा पक्ष आदर करील, असे मला वाटते, असेही त्या म्हणाल्या. धर्मांतराशी भाजपचा संबंध नाहीबळजबरीने केल्या जाणाऱ्या धर्मांतराशी भाजपचा संबंध नाही. अशा पद्धतीने धर्मांतर घडवून आणण्याच्या बाजूने मी नाही, असे इल्मी यांनी एका उत्तरात सांगितले. दिल्ली भाजपच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय आणि दिल्लीचे प्रभारी प्रभात झा यांच्या उपस्थितीत इल्मी यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. यावेळी संगीतकार व गायक आनंद राज आनंद यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.निवडणूक समितीची सोमवारी बैठकभाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची सोमवार १९ जानेवारी रोजी बैठक होत आहे. २१ जानेवारी हा नामांकन दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. बेदींना भावी मुख्यमंत्र्याच्या रूपात समोर आणायचे की नाही याबाबत भाजपमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे, कारण हरियाणा, महाराष्ट्र व झारखंडमधील निवडणुकीत मोदी यांच्याच प्रतिमेचा आधार घेण्यात आला होता. बेदींना निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्षपद दिले जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)