शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

"ए मनोरमा, बता ना यार..."; नितीश कुमारांच्या महिला आमदाराला हिंदीही वाचता येईना, शपथ घेतानाच गोंधळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 17:19 IST

बिहारमधील महिला आमदाराला हिंदीतून शपथ वाचता येत नसल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Bihar Assembly: बिहारच्या १८ व्या विधानसभेच्या पहिल्या सत्रात सोमवारी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. प्रोटेम स्पीकर नरेंद्र नारायण यादव यांच्यासमोर सर्व आमदारांनी शपथ घेतली. शपथविधी समारंभात नवादा येथील जेडीयू आमदार आणि बाहुबली राजबल्लभ यादव यांच्या पत्नी विभा देवी यांच्या शपथग्रहणाने सर्वाधिक लक्ष वेधले. पहिल्यांदाच आमदार म्हणून सभागृहात आलेल्या विभा देवी शपथपत्र वाचताना वारंवार अडखळत होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे  तणाव दिसत होता. त्या शपथ पत्रातील वाक्ये नीट बोलूही शकत नव्हत्या. त्या अनेक वेळा थांबत असल्याने सभागृहात काही क्षण शांतता पसरली होती. त्यांची ही अडचण पाहून त्यांच्या बाजूला बसलेल्या सहकारी आमदार मनोरमा देवी यांनी तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला आणि हळू आवाजात त्यांच्या कानात योग्य शब्द सांगितले. मनोरमा देवींच्या मदतीने विभा देवी तुटक शब्दांत का होईना, पण आपली शपथ पूर्ण करू शकल्या.

विभा देवींना हिंदीची एकही ओळ वाचता येत नव्हती. त्या अडखळत राहिल्या आणि ओळी विसरत राहिल्या. मग त्यांनी जवळ बसलेल्या मनोरमा देवींना, "अरे मनोरमा, मला सांग ना, यार" असं म्हटलं. त्यानंतर मनोरमा देवी सांगायला लागल्या मग विभा देवी तिच्या मागे पुन्हा बोलत होत्या. संपूर्ण सभागृह हा सर्व प्रकार पाहत होता. विभा देवींच्या या अडखळण्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकाही झाली. काही युझर्सनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून प्रश्न उपस्थित केले. राजकारणातील एका कुटुंबातून आलेल्या नवीन लोकप्रतिनिधीसाठी स्वतःची ओळख निर्माण करणे किती आव्हानात्मक असते, हेही या घटनेतून दिसून आले.

दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्या बाबतीतही शपथ वाचताना एक छोटीशी चूक झाली. रेणू देवी यांनी शपथ चुकीच्या पद्धतीने वाचल्याचे प्रोटेम स्पीकर नरेंद्र नारायण यादव यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित त्यांना थांबवले आणि योग्य पद्धतीने शपथ पुन्हा घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर रेणू देवींनी पुन्हा एकदा शपथ घेतली.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar MLA struggles with oath, seeks help from colleague.

Web Summary : Bihar MLA Vibha Devi stumbled during her oath, unable to read Hindi fluently. Colleague Manorama Devi assisted her, prompting social media criticism regarding her qualifications. Another MLA, Renu Devi, was asked to retake her oath due to an error.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Janta Dal Unitedजनता दल युनायटेड