'बिहारमध्ये BJP एकटी लढली असती तर फायदा झाला असता', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 03:49 PM2024-01-29T15:49:07+5:302024-01-29T15:49:42+5:30

'जेडीयूला विधानसभा निवडणुकीत 20 जागाही मिळणार नाहीत. असे झाले, तर मी निवृत्ती घेईन.'

Bihar Politics, prashant kishore 'It would have been beneficial if BJP had fought alone in Bihar', claims Prashant Kishore | 'बिहारमध्ये BJP एकटी लढली असती तर फायदा झाला असता', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा

'बिहारमध्ये BJP एकटी लढली असती तर फायदा झाला असता', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा

Bihar Politics (Marathi News) :बिहारचे मुख्यमंत्री आणि JDU प्रमुख नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी INDIA आघाडीपासून फारकत घेत NDA सोबत सरकार स्थापन केले आहे. काल(दि.28) नितीश कुमारांनी नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या सरकारमध्ये भाजपचे दोन उपमुख्यमंत्री असतील. दरम्यान, यामुळे विरोधक त्यांना संधीसाधू, पलटूराम अन् आयाराम-गयाराम म्हणत आहेत. या सगळ्यात जनसूरज अभियानाचे प्रमुख आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

संबंधित बातमी- 'भाजपने भावी पंतप्रधानांना मुख्यमंत्रीपदावरच रोखले', अखिलेश यादव यांची शेलक्या शब्दात टीका

नितीश कुमारांची आयुष्यातील शेवटची इनिंग...
एका हिंदी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी नितीश कुमारांवर जोरदार हल्लाबोल करत भाजपला विध्वंसक पक्ष म्हटले. 'भाजपने इंडिया आघाडी नष्ट करण्यासाठीच हे पाऊल उचलले आहे. बिहारमध्ये भाजप एकट्याने लढला असता तर जास्त फायदा झाला असता. नितीश कुमार कधी काय करतील, हे कोणालाच माहीत नाही. जनतेने त्यांना नाकारले आहे, त्यामुळे ते आपली खुर्ची वाचवण्यासाठी काहीही करू शकतात. नितीश त्यांच्या आयुष्यातील शेवटची इनिंग खेळत आहेत,' अशी टीका पीकेंनी केली. 

संबंधित बातमी- 'नितीश कुमारांना विरोध होता अन् भविष्यातही राहील...', PM मोदींचे 'हनुमान' स्पष्टच बोलले

एनडीए क्लीन स्वीप मारेल
'नितीश कुमारच नाही तर बिहारमधील सर्वच पक्ष 'पलटूराम' आहेत. 2025 च्या निवडणुकीत ही युती टिकू शकणार नाही. या युतीमुळे भाजपचे मोठे नुकसान होणार आहे. भाजप एकटा लढला असता तर जिंकण्याच्या स्थितीत राहिला असता.' 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत मोठे भाकीत करताना प्रशांत किशोर म्हणाले, 'भाजप/एनडीए निवडणुकीत क्लीन स्वीप मारेल आणि नरेंद्र मोदी, हा त्यांचा एकच मुद्दा असेल. सध्या त्यांच्या आजूबाजूला कोणीही दिसत नाही.'  

संबंधित बातमी- 'रंग बदलण्यात नितीश कुमार सरड्यांना टक्कर देताहेत', कांग्रेस नेत्याची संतप्त प्रतिक्रिया

...तर निवृत्ती घेईल
'नितीश कुमार धूर्त आहेत, त्यांनी बिहारच्या जनतेची फसवणूक केली. पण, बिहारचे लोक व्याजासह त्याची परतफेड करतील. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने साथ सोडली किंवा त्यांच्या नेत्याचा चेहरा समोर ठेवला, तर जनता जेडीयूला नाकारेल. नितीश कुमार कोणासोबतही लढले, तरीदेखील पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला 20 जागाही मिळणार नाहीत. असे झाले, तर मी निवृत्ती घेईन,' असंही पीके यावेळी म्हणाले.  

Web Title: Bihar Politics, prashant kishore 'It would have been beneficial if BJP had fought alone in Bihar', claims Prashant Kishore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.