शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

पोखरणमध्ये रंगणार सर्वांत मोठा युद्ध सराव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 06:19 IST

शत्रूच्या हद्दीत वेगाने शिरून त्याला नामोहरम करणारा सर्वांत मोठा 'सिंधू सुदर्शन' हा युद्धसराव पोखरणच्या वाळवंटातील फिल्ड फायरिंग रेंजमध्ये शुक्रवारपासून होणार आहे.

निनाद देशमुख पोखरण : शत्रूच्या हद्दीत वेगाने शिरून त्याला नामोहरम करणारा सर्वांत मोठा 'सिंधू सुदर्शन' हा युद्धसराव पोखरणच्या वाळवंटातील फिल्ड फायरिंग रेंजमध्ये शुक्रवारपासून होणार आहे. या युद्धसरावात हवाई दल व लष्कराचे ४० हजार जवान सहभागी होणार आहेत.पश्चिम सीमेकडील राष्ट्राच्या सीमेत खोलवर शिरत हल्ला करून त्यांची ठिकाणे कशी उद्ध्वस्त करायची हा युद्धसरावाचा उद्देश आहे. वाळवंटातील परिस्थितीत कसे लढायचे, आपसात ताळमेळ कसा राखायचा, व्यूहरचना कशी आखायची, लष्कराच्या सर्व विभागांचा सक्रिय सहभाग कसा ठेवायचा याचाही अभ्यास केला जाणार आहे. दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी हे तयारीचा आढावा घेणार आहेत. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या अखत्यारीत देशाचा ४० टक्के भूभाग येतो. सुदर्शन चक्र स्ट्राइक कोरचे मुख्यालय भोपाळ येथे आहे.पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कराने केलेली कारवाई, बालाकोटमधील दहशतवदी तळावर हवाई दलाने केलेले हल्ले आणि काश्मीरमधील कलम ३७० हटवल्याने भारत व पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला तणाव या पार्श्वभूमीवर या सरावाला विशेष महत्त्व आहे.>दोन महिने चालणार सरावदोन महिने चालणाऱ्या या युद्धसरावाचे आयोजन लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या सुदर्शन चक्र स्ट्राइक कोअरने केले आहे. गेली तीन वर्षे असा युद्ध सराव केला जातो. यंदा प्रथमच लष्करासोबत हवाई दल यात सहभागी होणार आहे. तब्बल ४० हजार पायदळ सैन्याबरोबरच टँक डिव्हिजन, आर्टिलरी डिव्हिजन, आर्मी एव्हिएशन व एअर डिफेन्स डिव्हिजन यात सहभागी होतील.