मोठी बातमी: जम्मूमध्ये फारुख अब्दुल्ला यांना लक्ष्य करून गोळीबार, उपमुख्यमंत्री जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 23:56 IST2026-03-11T23:47:17+5:302026-03-11T23:56:04+5:30

Farooq Abdullah News: जम्मू-काश्मीरमध्ये आज संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. जम्मूमधील ग्रेटर कैलाश परिसरामध्ये असलेल्या हॉटेल पार्कमध्ये आयोजित विवाह सोहळ्यामध्ये गोळीबार झाला.

Big news: Firing targeting Farooq Abdullah in Jammu, Deputy Chief Minister injured | मोठी बातमी: जम्मूमध्ये फारुख अब्दुल्ला यांना लक्ष्य करून गोळीबार, उपमुख्यमंत्री जखमी

मोठी बातमी: जम्मूमध्ये फारुख अब्दुल्ला यांना लक्ष्य करून गोळीबार, उपमुख्यमंत्री जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये आज संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. जम्मूमधील ग्रेटर कैलाश परिसरामध्ये असलेल्या हॉटेल पार्कमध्ये आयोजित विवाह सोहळ्यामध्ये गोळीबार झाला. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फ्रन्सचे ज्येष्ठ नेत फारुख अब्दुला यांना लक्ष्य करून गोळीबार करण्याचा प्रयत्न  झाल्याचे सांगण्यात येत आहे. या गोळीबारानंतर फारुख अब्दुल्ला हे सुरक्षित आहेत. तर गोळ्यांचे छर्रे लागल्याने जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. 

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार जम्मूमधील ग्रेटर कैलाश परिसरामध्ये असलेल्या हॉटेल पार्कमध्ये आयोजित विवाह सोहळ्यामध्ये फारुख अब्दुल्ला हे सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री सुरिंदर खन्ना आणि पक्षाचे इतर नेतेही होते. त्याच वेळी एका व्यक्तीने पिस्तूल दाखवत गोळीबार केला. मात्र तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत या इसमाला ताब्यात घेतले. या घटनेत जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी हे छर्रे लागल्याने किरकोळ जखमी झाले आहेत. तर फारुख अब्दुल्ला हे पूर्णपणे सुरक्षित आहेत. 

पोलिसांना या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी केली जात आहे. आरोपीचं नाव कमल सिंह जमवाल असं आहे. आता पोलीस या गोळीबारामागच्या कारणाचा तपास करत आहेत. तसेच या घटनेबाबतची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची रेकॉर्डिंगही तपासली जात आहे. 

Web Title : जम्मू में फारूक अब्दुल्ला को निशाना बनाकर गोलीबारी, उपमुख्यमंत्री घायल

Web Summary : जम्मू में एक विवाह समारोह में फारूक अब्दुल्ला को निशाना बनाकर गोलीबारी की गई। वह सुरक्षित हैं, लेकिन उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी छर्रे लगने से घायल हो गए। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Farooq Abdullah Targeted in Jammu Shooting, Deputy CM Injured

Web Summary : In Jammu, Farooq Abdullah was targeted in a shooting at a wedding. He is safe, but Deputy CM Surinder Choudhary sustained injuries from shrapnel. Police are investigating.