शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 15:39 IST

Kangana Ranaut in trouble: एक पोस्ट रिट्विट केल्याने कंगना अडचणीत, वाचा सविस्तर

Kangana Ranaut in trouble: हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भाजपा खासदार आणि चित्रपट अभिनेत्री कंगना राणौत हिला पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने त्यांच्याविरुद्धचा मानहानीचा दावा रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. हे प्रकरण २०२१ चे आहे, जेव्हा शेतकरी आंदोलन सुरू होते. त्या काळात कंगनाने केलेल्या पोस्टवरून ती अडचणीत आली होती.

नेमके प्रकरण काय?

कंगनाच्या ट्विटनंतर महिंदर कौर यांनी ४ जानेवारी २०२१ रोजी मानहानीचा खटला दाखल केला होता. ही सुनावणी सुमारे १३ महिने चालली. त्यानंतर भटिंडा न्यायालयाने कंगनाला समन्स जारी केले आणि तिला हजर राहण्याचे आदेश दिले. यानंतर कंगनाने पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयात दिलासा मिळावा यासाठी याचिका दाखल केली, ती आता फेटाळण्यात आली आहे. या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना कंगनाने म्हटले होते की, तिने एका वकिलाची पोस्ट रिपोस्ट केली होती. कंगनाच्या उत्तराने न्यायालयाचे समाधान झाले नाही. त्यामुळे न्यायालयाने कंगनाची याचिका फेटाळून लावली आहे. आता या प्रकरणात भटिंडा न्यायालयात पुढील कार्यवाही होईल.

याचिका फेटाळली, न्यायालयाचे मत काय?

कंगनाची याचिका फेटाळताना न्यायमूर्ती त्रिभुवन सिंह दहिया यांनी महत्त्वाचा निर्णय दिला. न्यायालयाने म्हटले आहे की, या प्रकरणात जो याचिकाकर्ता आहे, तो एक सेलिब्रिटी आहे. अशा व्यक्तीने विशिष्ट आरोप केल्याने रिट्विटमध्ये उल्लेख केलेल्या महिलेची खोट्या आणि अपमानास्पद आरोपांमुळे प्रतिष्ठा खराब झाली. उच्च न्यायालयाने पुढे म्हटले की, दंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणातील सर्व पैलूंचा योग्य प्रकारे विचार केला आहे. कंगनाच्या विरोधात प्रथमदर्शनी मानहानीचा खटला (कलम ४९९) तयार झाल्याचा निर्णय दिल्यानंतरच त्यांनी कार्यवाही सुरू केली आहे. आता कंगनाला पंजाबच्या स्थानिक न्यायालयात या खटल्याला सामोरे जावे लागणार आहे.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतCourtन्यायालयTwitterट्विटरFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपPunjabपंजाब