शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोरांविरुद्ध भूतानची मदत घेणार?

By admin | Updated: December 26, 2014 05:25 IST

आसामच्या कोकराझार, सोनितपूर आणि चिरांग जिल्ह्यांत नॅशनल डेमॉक्रेटिक फ्रंट आॅफ बोडोलँडच्या (एनडीएफबी-एस) बंडखोरांविरुद्ध कठोर

गुवाहाटी/सोनितपूर : आसामच्या कोकराझार, सोनितपूर आणि चिरांग जिल्ह्यांत नॅशनल डेमॉक्रेटिक फ्रंट आॅफ बोडोलँडच्या (एनडीएफबी-एस) बंडखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची ग्वाही केंद्र सरकारने दिली आहे़ उल्फाविरोधी मोहिमेच्या धर्तीवर एनडीएफबी-एसविरुद्ध मोहीम सुरू करण्यासाठी भूतान सरकारशी संपर्क साधण्याचाही सरकारचा विचार आहे़एनडीएफबी-एस बंडखोरांनी आसामच्या दुर्गम भागातील तीन जिल्ह्यांवर हल्ला केला होता. आणखी सहा मृतदेह सापडल्यानंतर या हिंसाचारातील बळींची संख्या आता ७८ वर पोहोचली आहे़ कें द्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी हिंसाचारग्रस्त सोनितपूरचा दौरा केल़ा़ बोडो बंडखोरांचा हिंसाचार सरकार कदापी सहन करणार नाही़ एनडीएफबी (एस) विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले़ एनडीएफबी (एस) विरुद्ध निश्चितपणे मोहीम छेडली जाईल; मात्र कधी, हे तूर्तास सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले़ परराष्ट्रमंत्र्यांना आवाहनडेमॉक्रेटिक फ्रंट आॅफ बोडोलॅण्ड (एनडीएफबी-एस) बंडखोरांवर अंकुश आणण्यासाठी भूतानची मदत घेण्याचा विचार सरकारने चालवला आहे़ या प्रकरणी तात्काळ भूतानच्या अधिकाऱ्यांची मदत घ्यावी, असे विनंतीवजा आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना केल्याचे कळते़एनडीएफबीने भारत-भूतान सीमेवरील घनदाट जंगलात आपली काही ठिकाणे तयार केल्याचे मानले जाते़ भारतीय सुरक्षा दलांनी मोहीम उघडताच, एनडीएफबी बंडखोर पळून भूतान भागात दडून बसतात़ यामुळे त्यांच्यासोबत लढा देणे कठीण होते़सन २००३-०४ मध्ये भूतानने उल्फाविरुद्ध मोहीम चालवून त्यांना आपल्या देशातून हाकलले होते व त्यांची सारी ठिकाणे नष्ट केली होती़ (वृत्तसंस्था)