माळवाडीत स्वच्छतागृहाचे भूमिपूजन

By Admin | Updated: September 1, 2015 23:35 IST2015-09-01T21:38:20+5:302015-09-01T23:35:40+5:30

वाल्हे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडी येथे पंतप्रधान स्वच्छता निधी व रोहरी बल्बच्या माध्यमातून मंजूर झालेल्या मुला-मुलींच्या स्वच्छतागृहाचे भूमिपूजन ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर दुर्गाडे यांच्या हस्ते करण्यात आले. लोकवर्गणीतून जमा केलेल्या वॉटर फिल्टरचे उद्घाटन वाल्हे गावच्या सरपंच कल्पनाताई गोळे यांच्या हस्ते करण्यात आले.

Bhalipudhan of the Malavadi Sanitary Garage | माळवाडीत स्वच्छतागृहाचे भूमिपूजन

माळवाडीत स्वच्छतागृहाचे भूमिपूजन

वाल्हे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडी येथे पंतप्रधान स्वच्छता निधी व रोहरी बल्बच्या माध्यमातून मंजूर झालेल्या मुला-मुलींच्या स्वच्छतागृहाचे भूमिपूजन ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर दुर्गाडे यांच्या हस्ते करण्यात आले. लोकवर्गणीतून जमा केलेल्या वॉटर फिल्टरचे उद्घाटन वाल्हे गावच्या सरपंच कल्पनाताई गोळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी मुख्याध्यापक विलास दुर्गाडे यांनी सांगितले की, शाळेची गुणवत्ता उत्कृष्ट असल्याने जिल्हा परिषद शाळा माळवाडीची पटसंख्या गेल्या ३ वर्षांत १० वरून २९ विद्यार्थ्यांपर्यंत वाढली आहेत. शाळेच्या परिसरात संरक्षणभिंतीचे व बाग शाळेची सजावट, पिण्याचे पाणी इत्यादी पायाभूत सुविधांची पूर्तता झालेली आहे. शाळेमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता तिसरीपर्यंत सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू आहेत. त्यामुळे ग्रामस्थांचा प्रतिसाद चांगला मिळतो.
कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे सरपंच कल्पनाताई गोळे, उपसरपंच पोपटनाना पवार, चंद्रशेखर दुर्गाडे, सुनीता भुजबळ, वंदना गायकवाड, मीनाक्षी कुंभार, साधना पवार, हनुमंत पवार, बाळासो भुजबळ, अनिल गायकवाड, संतोष गरुड इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन विलास दुर्गाडे यांनी केले, तर आभार उपशिक्षक गणेश म्हेत्रे यांनी मानले.

Web Title: Bhalipudhan of the Malavadi Sanitary Garage