शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून आणखी एकाचा खून, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
5
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
6
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
7
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
8
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
9
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
10
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
11
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
12
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
13
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
14
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
15
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
16
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
17
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
18
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
19
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
20
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
Daily Top 2Weekly Top 5

Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 09:13 IST

बंगळुरुतील चिन्नास्वामी स्टेडियम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले.

Bengaluru Stampede: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयानंतर बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या दुःखद घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोठी घोषणा केली आहे. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर आरसीबीच्या विजयाचे सेलीब्रेशन सुरु असताना झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला होता तर ६० जण जखमी झाले होते. त्यानंतर आता चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची भरपाई रक्कम देण्याचे आदेश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहेत. यापूर्वी पीडितांना १० लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता रकमेत वाढ करण्यात आली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना जाहीर केलेली भरपाईची रक्कम १० लाख रुपयांवरून २५ लाख रुपये वाढवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी ही रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिकाऱ्यांना हे नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरून त्यांना आर्थिक मदत मिळू शकेल.

"मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृतांच्या कुटुंबियांना भरपाईची रक्कम प्रत्येकी २५ लाख रुपये करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी सरकारने प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली होती," असं मुख्यमंत्री कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

१८ वर्षांनंतर आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी हजारो लोक चिन्नास्वामी स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी जमले होते. स्टेडियम बाहेर अचानक गर्दी अनियंत्रित झाल्याने मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत ११ जणांना आपला जीव गमवावा लागला आणि अनेक जण जखमी झाले.

दरम्यान, याप्रकरणी चेंगराचेंगरीच्या प्रकरणात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोठी कारवाई केली. या घटनेप्रकरणी पोलिस निरीक्षकांपासून ते आयुक्त स्तरापर्यंतच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. क्यूबन पार्क पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक, स्टेशन हाऊस मास्टर, स्टेशन हाऊस ऑफिसर, एसीपी, सेंट्रल डिव्हिजन डीसीपी, क्रिकेट स्टेडियम इन्चार्ज, अतिरिक्त पोलिस आयुक्त, पोलीस आयुक्त यांना तात्काळ निलंबित करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं. या अधिकाऱ्यांकडून प्रथमदर्शनी निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा दिसून आला. त्यामुळे त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.

टॅग्स :Bengaluru Stampedeबंगळुरुमध्ये चेंगराचेंगरीSiddaram Mhetreसिध्दाराम म्हेत्रेKarnatakकर्नाटक