शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बराक ओबामा यांना ‘महाराजा’चे आवतन; रेल्वेने आग्रा भेटीचा प्रस्ताव

By admin | Updated: January 20, 2015 01:29 IST

भारत भेटीवर येणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या कुटुंबियांनी आलिशान ‘महाराजा एक्स्प्रेस’ने प्रवास करून भारतीय रेल्वेच्या राजेशाही आदरातिथ्याचा आस्वाद घ्यावा,

नवी दिल्ली : पुढील आठवड्यात भारत भेटीवर येणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या कुटुंबियांनी आलिशान ‘महाराजा एक्स्प्रेस’ने प्रवास करून भारतीय रेल्वेच्या राजेशाही आदरातिथ्याचा आस्वाद घ्यावा, असे औपचारिक निमंत्रण ‘इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन’ने (आयआरसीटीसी) दिले आहे.‘आयआरसीटीसी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ए. के. मनोचा यांनी सांगितले की, पंतप्रधान कार्यालयाकडून रूकार घेतल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयामार्फत यासाठी ओबामा यांना औपचारिक निमंत्रण पाठविण्यात आले आहे. हे निमंत्रण स्वीकारले गेले तर ओबामा आणि त्यांचे कुटुंबीय ‘महाराजा एक्स्प्रेस’च्या एका रात्रीचे तीन हजार अमेरिकन डॉलर एवढे भाडे असलेल्या ‘प्रेसिडेन्शियल स्यूट’मधून प्रवास करतील.मनोचा म्हणाले की, ओबामा २७ जानेवारीस दिल्लीहून आग्रा येथे जातील अशी अपेक्षा आहे व त्यांनी ही सफर आमच्या ‘महाराजा एक्स्प्रेस’ मधून राजेशाही थाटाने करणे आदर्श ठरेल, असे आम्हाला वाटते. तेवढा वेळ नसेल तर त्यांनी निदान या रेल्वेगाडीतून दिल्लीभोवती छोटासा फेरफटका मारावा किंवा निदान या गाडीत शाही मेजवानीचा तरी आस्वाद घ्यावा, अशी आमची विनंती आहे.ते म्हणाले की, ‘महाराजा एक्स्प्रेस’ दिल्ली ते आग्रा हे अंतर सर्वसाधारणपणे अडीच तासांत कापते. पण शेवटी हे अतिथीवर अवलंबून आहे. त्यांना जर निवांतपणे प्रवास करायचा असेल तर त्यानुसार गाडीचा वेग ठरविता येईल. आम्हाला फक्त दोन दिवस आधी कळविले तरी आमची जय्यत तयारी आहे. ओबामा आणि त्यांच्या कुटुंबियांनी फक्त हो म्हणायचा अवकाश. त्यांची ही सफर चिरस्मरणीय करण्याची जबाबदारी आमची, असा विश्वासही मनोचा यांनी व्यक्त केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)च्दोन दिवसांच्या भारत भेटीत दिल्लीतील सरकारी कार्यक्रमांखेरीज ओबामा जगप्रसिद्ध ताजमहाल पाहण्यासाठी आग्रा येथे जातील, असे जवळजवळ नक्की होत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या या प्रथम कुटुंबाने दिल्ली ते आग्रा हा प्रवास खास विदेशी पर्यटकांना राजेशाही रेल्वे सफरीचा अनुभव देण्यासाठी तयार केलेल्या आलिशान अशा ‘महाराजा एक्स्प्रेस’ने करावा, अशी रेल्वेची अपेक्षा आहे.च्आम्ही आठवड्यापूर्वीच निमंत्रण दिले आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांकडून अद्याप कळविले गेले नसले तरी आमचे निमंत्रण स्वीकारले जाईल, अशी आम्हाला आशा आहे. निमंत्रण अद्याप नाकारलेही गेलेले नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.