शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
3
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
4
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
5
NCB आणि ATS ची मोठी कारवाई; 90 KG ड्रग्ससह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक
6
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
7
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
9
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
10
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
11
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
12
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
13
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
14
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
15
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
16
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
17
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
18
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
19
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
20
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली

भारतालाही 'डिजिटल स्ट्राइक' करणे माहीत आहे - रविशंकर प्रसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 2:30 PM

भारताला आपल्या सीमेवर डोळ्यात डोळे घालून बोलणे माहीत आहे आणि भारताला लोकांच्या संरक्षणासाठी डिजिटल स्ट्राइक करणे सुद्धा माहीत आहे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.

ठळक मुद्देगेल्या सोमवारी भारताने टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली. भारताने चीनला धडा शिकवण्याचा दृढनिश्चय केला आहे. सध्या भारत चीनला आर्थिक आघाडीवर धक्का देत आहे.

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारत चीनला आर्थिक आघाडीवर धक्का देत आहे. गेल्या सोमवारी भारताने टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली. ही बंदी घातल्यानंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, देशवासीयांच्या रक्षणासाठी भारत डिजिटल स्ट्राइकही सुद्धा करू शकतो. भारताची सुरक्षा आणि सार्वभौमत्वासाठी, देशवासियांची डिजिटल सुरक्षा आणि गोपनीयतेसाठी टिकटॉकसह  59 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

भारताला आपल्या सीमेवर डोळ्यात डोळे घालून बोलणे माहीत आहे आणि भारताला लोकांच्या संरक्षणासाठी डिजिटल स्ट्राइक करणे सुद्धा माहीत आहे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले. तसेच, ते म्हणाले की मोबाइल अ‍ॅप्सच्या बाबतीत देशाला स्वावलंबी बनवावे लागेल. याआधी डिजिटल इंडियाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले होते की, "आम्ही चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे, मला वाटते ही मोठी संधी आहे. भारतीयांनी बनवलेले चांगले अ‍ॅप्स मार्केटमध्ये येऊ शकतात? आपल्याला बर्‍याच कारणांमुळे आपल्या अजेंडावर चालणार्‍या परदेशी अ‍ॅप्सवर अवलंबून राहणे थांबवावे लागेल."

भारताकडे टॅलेंटची कमतरता नाही. सरकारकडून त्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. तसेच, या टॅलेंटला आपल्यासारख्या (इन्फोसिसचे नंदन निलेकणी) लोकांच्या मदतीची आवश्यकता आहे. देशात सार्वजनिक खाजगी भागीदारीची मोठी शक्यता आहे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले होते. याशिवाय, आमचे उद्दिष्ट सॉफ्टवेअरच्या क्षेत्रातही भारताला स्वावलंबी बनविणे आहे. त्यासाठी स्टेक होल्डरसोबत चर्चा करून धोरण आखले गेले आहे. सर्व डिजिटल माध्यमामध्ये आत्मनिर्भर राहून भारत सॉफ्टवेअर क्षेत्रात आत्मनिर्भर व्हावा, अशी आमची इच्छा आहे. भारत हा जगातील सॉफ्टवेअर हब बनला पाहिजे, असेही रविशंकर प्रसाद म्हणाले होते.

दरम्यान, 15 जूनला पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिक यांच्यात झालेल्या हिंसक चकमकीनंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. या घटनेनंतर भारताने चीनला धडा शिकवण्याचा दृढनिश्चय केला आहे. भारत सध्या चीनला आर्थिक आघाडीवर धक्का देत आहे.  गेल्या सोमवारी मोदी सरकारने टिकटॉक, शेअरईट, हॅलो, यूसी ब्राउझर ​​यासह एकूण 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे.

याशिवाय, बुधवारी बीएसएनएल आणि एमटीएनएलने आपले 4 जी टेंडर रद्द केले आहे. आता पुन्हा नवीन टेंडर जारी केले जाणार आहे. सरकारने बीएसएनएल आणि एमटीएनएलला चिनी कंपन्यांकडून वस्तू न खरेदी करण्याचे निर्देश दिले होते, त्यानंतर यासंबंधीच्या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. आता नव्या निविदेत मेक इन इंडिया आणि भारतीय टेक्नॉलॉजीला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन तरतुदी असणार आहेत.

विशेष म्हणजे, बीएसएनएल आणि एमटीएनएलवर सर्वाधिक चिनी उत्पादने खरेदी केल्याचा आरोप होता. यानंतर सरकारने निर्देश दिला होता की, सरकारी कंपन्यांनी चिनी कंपन्यांकडून वस्तू खरेदी करणे टाळावे. याचबरोबर, भारत आता सर्व महामार्ग प्रकल्पांमध्ये चिनी कंपन्यांवर बंदी घालण्याची तयारी करत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. चिनी कंपन्यांना संयुक्त उद्योजक भागीदार (जेव्ही) म्हणून काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

आणखी बातम्या...

ड्रॅगनला नरेंद्र मोदींचा दणका, Weibo वरून एक्झिट घेण्याचा निर्णय

तीन वर्षांच्या मुलाला वाचवणाऱ्या जवानाचं होतंय कौतुक, पण ओमर अब्दुल्लांकडून प्रश्नचिन्ह!

चीनला आणखी एक धक्का; BSNL-MTNL कडून 4G टेंडर रद्द!

'त्या' एका घटनेमुळं बदललं आयुष्य अन् बनली आयपीएस अधिकारी!

टॅग्स :Ravi Shankar Prasadरविशंकर प्रसादChinese Appsचिनी ऍपtechnologyतंत्रज्ञान