शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिक राष्ट्रध्वजांवर बंदी

By admin | Updated: June 16, 2014 04:03 IST

स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजांवर बंदी घातली आहे.

मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूर (जि. नगर)स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजांवर बंदी घातली आहे. त्यानुसार राज्य सरकारनेही बंदी घातली आहे. २६ जानेवारी व १५ आॅगस्टला विविध सरकारी, निमसरकारी तसेच खासगी संस्थांमार्फत ध्वजारोहण समारंभ होतात. राष्ट्रध्वजाविषयीचे आपले प्रेम, निष्ठा, अभिमान दाखविण्यासाठी वैयक्तिकरीत्या छोट्या कागदी व प्लॅस्टिक राष्ट्रध्वजांचा वापर होतो. शालेय विद्यार्थी व लहान मुलांसह अनेक व्यक्ती राष्ट्रभक्ती व उत्साहापोटी मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वज विकत घेतात. मात्र हे ध्वज त्याच दिवशी किंवा नंतर रस्त्याकडेला, जमिनीवर पडलेले आढळतात. प्लॅस्टिक लवकर नष्ट होत नसल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रप्रतिष्ठेच्या दृष्टीने ही बाब गंभीर असल्याने केंद्रीय गृह मंत्रालयाने प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजनिर्मितीस पायबंद घालण्यासाठी त्याचे उत्पादक, विक्रेते व वितरकांवर सरकारी यंत्रणांनी कारवाई करावी, असे आदेश राज्याच्या गृह विभागाने १४ जून रोजी दिले आहेत.राष्ट्रध्वजाचा अवमान करणे व त्याची विटंबना होणे हे बोधचिन्हे व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम, १९५० व राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम, १९७१ तसेच ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे जनतेच्या वैयक्तिक वापरासाठी छोट्या कागदी ध्वजाचा वापर करावा. पण त्यांचा वापर करताना त्याचा योग्य मान राखावा. राष्ट्रध्वज रस्त्यावर वा अन्य ठिकाणी फेकून देऊ नये. राष्ट्रध्वज खराब झाल्याचे आढळल्यास ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार नष्ट करावेत. राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, यासाठी तसेच राष्ट्रध्वजासाठी प्लॅस्टिकचा वापर होणार नाही, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.