शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

Ayodhya Verdict: आता प्रत्येक भारतीयावरची राष्ट्रनिर्मितीची जबाबदारी वाढली - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 18:17 IST

सर्वोच्च न्यायालयाने हा खटला संयमाने पाहिला आणि निकाल सर्वांच्या संमतीने लागला. देशाचे न्यायाधीश, न्यायालय आणि न्यायप्रणाली अभिनंदनास पात्र आहे.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एका महत्वपूर्ण प्रकरणावर निकाल दिला आहे. शेकडो वर्षांचा इतिहास होता. भारताची लोकशाही किती जिवंत आहे हे जगाने पाहिले. देशातील प्रत्येक नागरिकाने खुल्या मनाने निकाल स्वीकार केला आहे. भारत ज्याच्यासाठी ओळखला जातो विविधतेत एकता याचा मी गर्वाने उल्लेख करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने हा खटला संयमाने पाहिला आणि निकाल सर्वांच्या संमतीने लागला. देशाचे न्यायाधीश, न्यायालय आणि न्यायप्रणाली अभिनंदनास पात्र आहेत. 9 नोव्हेंबर हा असा दिवस आहे जेव्हा बर्लिनची भींत कोसळली होती. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या दिशांच्या आहेत. आजची तारीख अयोध्या निकाल आणि करतारपूर कॉरिडॉरसाठी महत्वाची होती, असे मोदी यांनी देशवासियांना संबोधताना म्हटले.

आजच्या दिवसाचा संदेश जोडण्याचा आहे आणि मिळून जगण्याचा आहे. या प्रकरणांवरून कोणाच्या मनात कटुता उरली असेल तर त्याला तिलांजली देण्याचा आजचा दिवस आहे. न्यायालयाने देशाला कठीणातला कठीण विषय संविधानाच्या माध्यमातून सोडविता येतो, असा संदेश दिला आहे. भारताचे संविधान, न्यायिक प्रणाली यावर आपला विश्वास तसाच रहावा हे महत्वाचे आहे. हा निकाल नवीन पहाट घेऊन आला आहे. या वादाचा अनेक पिढ्यांवर परिणाम झाला होता. मात्र, नव्या पिढीने नवी सुरुवात करावी, नवीन भारताची सुरुवात करावी. माझ्या सोबत चालणारा कुठे मागे तर राहिला नाही ना, याची दक्षता घ्यावी, असेही मोदी म्हणाले.

राम मंदिराच्या निर्मितीचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्याचबरोबर देशाच्या निर्माणाची जबाबदारी आणखी वाढली आहे. प्रत्येक भारतीयाने त्याचे दायित्व, कर्तव्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. भारतासमोर आव्हाने अनेक आहेत. सर्वांनी एकत्र येऊन मात करावी, असे आवाहनही मोदी यांनी देशवासियांना केले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर