अविनाश स्नानासाठी गंगेत उतरला आणि पाय सटकला; राफ्टिंग गाईड देवदूतासारखा धावला, CPR देत वाचवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 19:07 IST2026-01-27T19:05:47+5:302026-01-27T19:07:44+5:30
मित्रांसोबत गंगास्नानासाठी अविनाश नदीपात्राच्या काठावर उभा होता. पण, त्याचवेळी पाय निसटला आणि तो गंगेच्या पाण्यात पडला. त्याला वाचवतानाचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

अविनाश स्नानासाठी गंगेत उतरला आणि पाय सटकला; राफ्टिंग गाईड देवदूतासारखा धावला, CPR देत वाचवले
देवदर्शन आणि फिरण्यासाठी आलेला तरुण गंगेच्या पात्रात पडला आणि बुडू लागला. वाहून जात असतानाच लोकांनी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून राफ्टिंग गाईड धावले. त्यांनी पाण्यात बुडालेल्या अविनाशला त्यांनी काठावर आणले. त्यानंतर वेळीच सीपीआर दिला. त्यामुळे त्याचे प्राण वाचले.
२६ वर्षीय अविनाश हा गुरुग्राममध्ये राहतो. तो २६ जानेवारी रोजी मित्रांसोबत फिरण्यासाठी आला होता. त्यानंतर सगळे मित्र गंगा स्नान करण्यासाठी पोहोचले. ऋषिकेशमध्ये ते गंगेच्या काठावर होते. त्याचवेळी अविनाशचा पाय निसटला आणि तोल जाऊन तो गंगा नदीच्या पात्रात पडला.
व्हिडीओ बघा
पाण्याचा वेग जास्त असल्याने अविनाश बुडू लागला. त्याने हात दाखवले, त्यानंतर काठावरील लोकांनी आरडाओरड करायला सुरूवात केली. आवाज ऐकून राफ्टिंग गाईड धावले.
ऋषिकेश में गंगा में डूबते पर्यटक को रस्सी फेंककर राफ्टिंग गाइड ने बाहर निकाल लिया!
— Sadaf Afreen صدف (@s_afreen7) January 27, 2026
मौके पर मौजूद दूसरे गाइड ने CPR देकर उस पर्यटक की जान बचा ली!
सलाम है इन गाइडों को!pic.twitter.com/BhQMTl2XlA
दोन राफ्टिंग गाईड बोट घेऊन तिथे पोहोचले. त्यांनी लगेच तरुणाला पकडले. काठावरून दोरी फेकण्यात आली. त्यानंतर अविनाशला काठावर आणण्यात आले. अविनाशला तातडीने सीपीआर देण्यात आला आणि त्यांचे प्राण वाचले.