शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण सौद्यांकडे पाश्चात्त्य देशांचे लक्ष

By admin | Updated: June 30, 2014 01:02 IST

अब्जावधी डॉलरचे सौदे पदरात पाडून घेण्यासाठी पाश्चिमात्य देशांमध्ये भारतभेटीची पर्यायाने मोदी भेटीची जणू स्पर्धा लागली आहे.

नवी दिल्ली : नवागत संरक्षण उद्योग विदेशी गुंतवणुकीसाठी खुला करण्याची तयारी सरकारने चालविली असताना अब्जावधी डॉलरचे सौदे पदरात पाडून घेण्यासाठी पाश्चिमात्य देशांमध्ये भारतभेटीची पर्यायाने मोदी भेटीची जणू स्पर्धा लागली आहे.
देशात सध्या बहुतांश शस्त्रस्त्रे लोप पावलेल्या सोव्हियत युगातील असून त्यांच्या अत्याधुनिकीकरणासाठी मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केली जाणार आहे. येत्या दहा दिवसांमध्ये फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटनचे ज्येष्ठ राजकारणी भारत भेटीवर येत आहेत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1947 पासून प्रत्येक पंतप्रधानाने भारताला संरक्षण क्षेत्रत आत्मनिर्भर करण्याचे ध्येय गाठण्यासाठी विशेष काही केलेले नाही. मोदींनी लष्कराची क्षमता वाढविण्यासाठी जगातील सर्वात मोठा शस्त्र आयातदार देश आणि नंतर सर्वात मोठा शस्त्र उत्पादक देश हे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
मोदींनी विदेशी गुंतवणुकीसाठी दारे उघडी करताना काही संरक्षण प्रकल्पांची संपूर्ण मालकी विदेशी कंपन्यांकडे देण्याचा पर्याय निवडला आहे. भारतीय संरक्षण बाजारातील हे स्थित्यंतर बघता अनेक पाश्चिमात्य राष्ट्रे स्पर्धेत उतरणार आहेत. काही तरी चमत्कारिक घडणार या आशेने प्रत्येकालाच प्रथम लाभ घेण्याची चुरस लागली आहे, असे लंडनच्या किंग्ज महाविद्यालयाचे आंतरराष्ट्रीय संबंध विषयाचे प्रो. हर्ष पंत यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
विदेशी नेत्यांची दिल्लीत रीघ लागणार
4सर्वप्रथम फ्रान्सचे विदेश मंत्री लॉरेन्ट फॅबिअस सोमवारी भारतात येत असून ते डॅसॉल्ट एव्हिऐशनच्या 126 रॅफल फायटर  जेट विमानांच्या  15 अब्ज डॉलरच्या रखडलेल्या सौद्याला गती देण्याला प्राधान्य देतील. ते मोदी आणि संरक्षण मंत्री अरुण जेटलींना भेटतील. संरक्षण सौद्यावर स्वाक्षरी करण्यासह निधी देण्याबाबत चर्चा होऊ शकते. 
4पुढील आठवडय़ात अमेरिकेचे सिनेटर जॉन मॅककेन हे दिल्लीत दाखल होत असून त्यांच्या अरिझोना प्रांतात मुख्यत: बोईंग आणि रेथॉन विमानांची निर्मिती होते. भारतासोबत आर्थिक आणि लष्करी संबंध बळकट करण्याची अमेरिकेची इच्छा असल्याचे त्यांनी गुरुवारी अमेरिकन सिनेटमध्ये स्पष्ट केले.