शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

खतप्रकल्पाबाबत स्थायी समितीच्या निर्णयाकडे लक्ष

By admin | Updated: September 15, 2016 01:23 IST

महापालिका : खासगीकरणाचा प्रस्ताव सादर

नाशिक : शहरातील बांधकाम परवानग्या मिळविण्यात अडसर ठरलेल्या खतप्रकल्पाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने अखेर स्थायी समितीकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. बांधकाम परवानग्यांबाबत शहरातील एकूणच जनमत लक्षात स्थायी समितीकडून सदर प्रस्तावाबद्दल जास्त काथ्याकूट न होता मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय हरित लवादाने खतप्रकल्पाच्या दुरवस्थेला महापालिकेला जबाबदार धरत खतप्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविणे व घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार करणे याबाबत दि. ११ सप्टेंबर २०१५ रोजी आदेशित केले होते. त्यासाठी लवादाने शहरातील बांधकाम परवानग्या काही अटी-शर्तीनुसारच देण्याचे बंधन घातले. जोपर्यंत खतप्रकल्प पूर्ण क्षमतेने व्यवस्थित चालविला जाणार नाही तोपर्यंत बांधकाम परवानग्यांसाठी अटी-शर्तींचे ओझे कायम राहणार आहे. तत्पूर्वी, डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपल्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीत खतप्रकल्पाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव आणत त्यासाठी निविदाप्रक्रिया राबविली. सदर निविदाप्रक्रियानुसार, पुणे येथील मेलहेम आयकॉस एन्व्हायर्मेंट प्रायव्हेट लिमिटेड व त्यांनी भागीदारांसह तयार केलेल्या कंपनीला ३० वर्षे कालावधीसाठी चालविण्यास देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. इतक्या मोठ्या कालावधीसाठी खतप्रकल्प खासगीकरणाच्या माध्यमातून चालविण्यास द्यायचा असल्याने गेडाम यांनी काही संस्थांकडून त्याबाबतची पडताळणीही करून घेतली होती. परंतु या प्रकारात मोठ्या प्रमाणावर कालापव्यय झाला. त्यामुळे खतप्रकल्प सुव्यवस्थित चालू होण्यास मुहूर्त मिळू न शकल्याने बांधकाम परवानग्यांप्रश्नी पेच कायम आहे. अभिषेक कृष्ण यांनी आयुक्तपदाची धुरा स्वीकारल्यानंतर त्यांनी बांधकाम परवानग्यांचे मूळ हे खतप्रकल्पात दडले असल्याचे लक्षात घेऊन खतप्रकल्पाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. स्थायी समिती आता नेमका काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)