दलित पोलिसाच्या मारेकरी अधिकाऱ्याची संपत्ती जप्त गाडीत समोरच्या जागेवर बसण्यावरून झाला होता वाद

By Admin | Updated: December 19, 2014 22:56 IST2014-12-19T22:56:56+5:302014-12-19T22:56:56+5:30

पाटणा : सहकारी पोलीस दलित असूनही समोरच्या आसनावर बसल्यामुळे त्याला रागाच्या भरात गोळ्या झाडून ठार करणारा पोलीस उपनिरीक्षक अजयकुमारसिंग यादव याची संपत्ती जप्त करण्याचा आदेश राज्य मानवाधिकार आयोगाने दिला आहे.

The assets of the killer officer of the Dalit police were seized from the seat sitting in front of the car | दलित पोलिसाच्या मारेकरी अधिकाऱ्याची संपत्ती जप्त गाडीत समोरच्या जागेवर बसण्यावरून झाला होता वाद

दलित पोलिसाच्या मारेकरी अधिकाऱ्याची संपत्ती जप्त गाडीत समोरच्या जागेवर बसण्यावरून झाला होता वाद

टणा : सहकारी पोलीस दलित असूनही समोरच्या आसनावर बसल्यामुळे त्याला रागाच्या भरात गोळ्या झाडून ठार करणारा पोलीस उपनिरीक्षक अजयकुमारसिंग यादव याची संपत्ती जप्त करण्याचा आदेश राज्य मानवाधिकार आयोगाने दिला आहे.
ठार झालेले पोलीस उपनिरीक्षक कृष्ण बैथा यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याचा आदेशही आयोगाने सारनच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
सारन जिल्ह्यातील बनियापूर पोलीस ठाण्यात सेवेत असलेले पोलीस उपनिरीक्षक बैथा यांची यादव याने बोलेरो गाडीत समोर बसण्याच्या वादातून हत्या केली होती. सप्टेंबर १३ मधील हे प्रकरण त्यावेळी चांगलेच गाजले होते. मात्र यादव याला अटक करण्यात झालेली दिरंगाई आणि एकूणच प्रकरणाची दखल राज्य मानवाधिकार आयोगाने घेतली आहे. बैथा यांचा मुलगा सुरेंद्र कुमार रजाक याने याबाबत तक्रार दाखल केली होती.
बैथा हे गाडीत समोरच्या आसनावर बसले असता यादव याने त्यांना धोबी असूनही समोरच्या आसनावर का बसला म्हणून हटकले होते. त्यानंतर त्याने सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मधून गोळ्या झाडल्या होत्या. याप्रकरणी ३१ जानेवारी १५ पर्यंत चौकशी पूर्ण करण्याचा आदेशही आयोगाने दिला.

Web Title: The assets of the killer officer of the Dalit police were seized from the seat sitting in front of the car