शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

Assembly election 2022: उत्तराखंडमध्ये BJPचा प्रयोग यशस्वी, योगींच्या कामावर जनता फिदा; पंजाबमध्ये काँग्रेसला फटका!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2021 9:43 PM

या निवडणुका अत्यंत महत्वाच्या मानल्या जात आहेत. कारण यात एका अशा राज्याचाही समावेश आहे जेथे देशातील सर्वाधिक 80 लोकसभा जागा आहेत. भाजपला 2024 मध्ये पुन्हा केंद्रात सत्तेवर विराजमान व्हायचे असेल, तर तर त्यांना यूपी विधानसभा निवडणुकीत विजयाचा झेंडा उंचावणे आवश्यक आहे.

नवी दिल्ली - पुढच्या वर्षात 2022च्या सुरुवातीला देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका अत्यंत महत्वाच्या मानल्या जात आहेत. कारण यात एका अशा राज्याचाही समावेश आहे जेथे देशातील सर्वाधिक 80 लोकसभा जागा आहेत. भाजपला 2024 मध्ये पुन्हा केंद्रात सत्तेवर विराजमान व्हायचे असेल, तर तर त्यांना यूपी विधानसभा निवडणुकीत विजयाचा झेंडा उंचावणे आवश्यक आहे. याशिवाय उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर येथेही विधानसभा निवडणुका होणार आहेत. (Assembly election 2022 ABP c voter survey for Uttar Pradesh Uttarakhand Punjab Goa and Manipur )

उत्तर प्रदेशात कुणाचं पारड राहणार जड? कोणाला किती जागा मिलू शकतात? -उत्तर प्रदेशात होणाऱ्या 2022 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपला 259 ते 267 जागा मिळू शकतात. तर समाजवादी पक्षाला 109 ते 117 जागा, बसपाला 12 ते 16 जागा, काँग्रेसला 3 ते 7 जागा आणि इतरांना 6 ते 10 जागा मिळू शकतात. उत्तर प्रदेशात जनता कोणत्या मुद्द्याला मतदान करेल? यासंदर्भात 3 टक्के लोकांनी भ्रष्टाचार, 39 टक्के लोकांनी बेरोजगारी, 26 टक्के लोकांनी महागाई, 19 टक्के लोकांनी शेतकरी, 10 टक्के लोकांनी कोरोना तर 3 टक्के लोकांनी इतर मुद्दे, असे सांगितले.

या एबीपी न्यूज सी व्होटर सर्वेक्षणात, भाजप युतीला 42 टक्के, समाजवादी पार्टी आघाडीला 30 टक्के, बहुजन समाज पार्टीला 16 टक्के, काँग्रेसला 5 टक्के, तर इतरांना 7 टक्के मते मिळू शकतात, असे दिसून आले आहे. या सर्वेक्षणात तब्बल 45 टक्के लोकांनी सांगितले की, ते उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या कामगिरीवर अत्यंत समाधानी आहेत. 20 टक्के लोकांनी कमी समाधानी असल्याचे म्हटले आहे. तसेच, 34 टक्के लोकांनी असमाधानी असल्याचे म्हटले आहे. या शिवाय एक टक्का लोकांनी सांगू शकत नाही, असे म्हटले आहे.

उत्तराखंडमध्ये कुणाला किती जागा -उत्तराखंडमधील सर्वेक्षणानुसार भाजपला 44 ते 48 जागा मिळू शकतात. काँग्रेसला 19 ते 23 जागा, आम आदमी पार्टीला 0 ते 4 जागा आणि इतरांना 0 ते 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. एबीपी न्यूज सी मतदार सर्वेक्षणानुसार उत्तराखंडमध्ये भाजपला 43 टक्के, काँग्रेसला 23 टक्के, आम आदमी पार्टीला 6 टक्के आणि इतरांना 4 टक्के मते मिळू शकतात.

अशी असू शकते पंजाबची स्थिती -एबीपी न्यूज सी व्होटर सर्वेक्षणानुसार, पंजाबमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत, काँग्रेसला 28.8 टक्के, शिरोमणी अकाली दलला 21.8 टक्के, आम आदमी पार्टीला 35.1 टक्के, भाजपला 7.3 टक्के आणि इतरांना 7 टक्के मतदान होऊ शकते. याशिवाय, येथील 18 टक्के जनतेला कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, असे वाटते. तर 22 टक्के लोकांना अरविंद केजरीवाल, 19 टक्के सुखबीर बादल, 16 टक्के भगवंत मान, 15 टक्के नवज्योतसिंग सिद्धू आणि 10 टक्के लोकांना इतर कुणी मुख्यमंत्रीपदावर विराजमान व्हावे असे वाटते.

पंजाबमध्ये आपला 51 ते 57 जागा मिळू शकतात -या सर्वेक्षणानुसार, आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 38 ते 46 जागा मिळू शकतात. तसेच आम आदमी पक्षाला 51 ते 57 जागा मिळू शकतात. दुसरीकडे अकाली दलाला 16 ते 24 जागा मिळू शकतात. तर भाजपला केवळ 1 जागा मिळू शकते आणि इतरांनांही केवळ एकच जागा मिळू शकते.

गोव्यात फुलू शकतं भाजपचं कमळ - गोव्यात भाजप पुन्हा एकदा सरकार बनवू शकते. येथे 22 ते 26 जागा भाजपच्या खात्यात येऊ शकतात. तर काँग्रेसला 3-7 जागा मिळू शकतात. याशिवाय, 4-8 जागा आम आदमी पक्षाला आणि 3-7 जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात. याशिवाय एकूण मतांचा विचार करता, भाजपला 39 टक्के, काँग्रेसला 15 टक्के, तर आम आदमी पार्टीला 22 टक्के आणि इतरांना 24 टक्के मते मिळू शकतात.

मणिपूरमध्ये कोणाला किती मते आहेत?या सर्वेक्षणानुसार, मणिपूरमध्ये भाजपला 40 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर 35 टक्के मते काँग्रेस, 6 टक्के एनपीएफ आणि 17 टक्के मते इतरांना मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकUttar Pradeshउत्तर प्रदेशPunjabपंजाबgoaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेसAam Admi partyआम आदमी पार्टीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीyogi adityanathयोगी आदित्यनाथArvind Kejriwalअरविंद केजरीवाल