भाजपाच्या पराभवासाठी औवेसी सरसावले, ममता बॅनर्जींकडे दोस्तीचा हात   

By महेश गलांडे | Published: November 19, 2020 01:36 PM2020-11-19T13:36:22+5:302020-11-19T13:37:29+5:30

पश्चिम बंगालमधील निवडणुकांसाठी एमआयएमच्या औवेसी यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे दोस्तीचा हात पुढे केला आहे. निवडणुकांपूर्वी आघाडी करण्यास उत्सुक आहे.

asauddin Owaisi rushed for BJP's defeat, hand of friendship to Mamata Banerjee | भाजपाच्या पराभवासाठी औवेसी सरसावले, ममता बॅनर्जींकडे दोस्तीचा हात   

भाजपाच्या पराभवासाठी औवेसी सरसावले, ममता बॅनर्जींकडे दोस्तीचा हात   

Next
ठळक मुद्देपश्चिम बंगालमधील निवडणुकांसाठी एमआयएमच्या औवेसी यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे दोस्तीचा हात पुढे केला आहे. निवडणुकांपूर्वी आघाडी करण्यास उत्सुक आहे.

कोलकाता - बिहारच्या विजयानंतर आता भारतीय जनता पक्षाने मिशन पश्चिम बंगालसाठी कंबर कसली आहे. यासाठी भाजपने पश्चिम बंगालचे पाच विभाग तयार केले असून प्रत्येकाची जबाबदारी एका नेत्याकडे निश्चित केली आहे. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसकडून सत्ता खेचण्याचं भाजपाचं स्वप्न आहे. तर, दुसरीकडे एआयएमआयएमचे नेते आणि खासदार असुदुद्दीन औवेसी यांनीही बिहारनंतर आपला मोर्चा बंगालच्यादिशेने वळवला आहे. 

पश्चिम बंगालमधील निवडणुकांसाठी एमआयएमच्या औवेसी यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे दोस्तीचा हात पुढे केला आहे. निवडणुकांपूर्वी आघाडी करण्यास उत्सुक आहे. भाजपाला पराभूत करण्यासाठी आमच्याकडून तृणमूल काँग्रेसल मदत करण्यात येईल, असे औवेसी यानी म्हटलं आहे. बिहारमधील सिमांचल भागात 5 जागांवर विजय मिळवल्यानंतर एमआयएमच्या पक्षाचा आणि नेत्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्यामुळेच, पश्चिम बंगालमधील निवडणुकांमध्ये आपण उमेदवार उभे करणार असल्याचं औवेसी यांनी म्हटलंय. त्यासाठी, एमआयएमची नजर अल्पसंख्याक समुदाय असलेल्या मालदा, मुर्शिदाबाद आणि उत्तरी दिनाजपूर येथे आहे. 

एमआयएम म्हणजे 'बाहरी' 

ममता बॅनर्जी यांनी नुकतेच एमआयएम पक्षावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता, काही बाहरी लोकांना परेशान करणार असल्याचं ममता यांनी म्हटलं होतं. तसेच, राज्यातील जनतेला बाहरी म्हणजे परराज्यातून येणाऱ्या पक्षाला विरोध करण्याचंही सांगितलं होतं. 

एमआयएमच्या एंट्रीने तृणमूलला नुकसान

बंगालमधील निवडणुकांत एमआयएमचा प्रवेश हा ममता बॅनर्जींच्या टीएमसीसाठी धोक्याची घंटा असल्याचं टीएमसीला वाटतंय. कारण, यंदा भाजपा विरुद्ध टीएमसी असा थेट सामना रंगणार आहे. तर, काँग्रेस आणि डाव्या पक्षांची लढाईसुद्धा तृणमूलसोबतच आहे. त्यामुळे, औवेसींचा एमआयएम पक्ष थेट निवडणुकांच्या रिंगणात उतरल्यास त्याचे नुकसान तृणमूल काँग्रेसलाच होणार आहे.  

भाजपकडून 5 नेत्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप

भाजपने आखलेल्या रणनीतीनुसार सुनील देवधर यांच्याकडे हावडा, हुगळी आणि मिदनापूर या विभागाची जबाबदारी असेल. विनोद तावडे हे नाबादीपमध्ये निवडणुकीची तयारी पाहतील. विनोद सोनकर यांच्याकडे बर्दमान तर हरीश द्विवेदी यांच्याकडे उत्तर बंगालची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे चारही नेते भाजपचे राष्ट्रीय सचिव आहेत. याशिवाय भाजपचे महासचिव दुष्यंत गौतम यांना कोलकाता विभागाचे निवडणूक प्रभारी करण्यात आले आहे. हे पाचही नेते नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत निवडणुकीच्या तयारीचा अहवाल तयार करून पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना सादर करतील. या अहवालानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालचा दौरा करण्याची शक्यता आहे.वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय हेच पश्चिम बंगाल राज्याचे प्रभारी असतील. 

गतनिवडणुकीत भाजपाला केवळ 3 जागा

गेल्या निवडणुकीत टीएमसीला सर्वाधिक २११, काँग्रेसला ४०, डाव्या पक्षांना २६ तर भाजपला केव‌ळ ३ जागा मिळाल्या होत्या. सत्तास्थापनेसाठी राज्यात १४८ जागा आवश्यक असतात

Web Title: asauddin Owaisi rushed for BJP's defeat, hand of friendship to Mamata Banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.