शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
3
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
4
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
5
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
6
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
7
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
8
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
9
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
10
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
11
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
12
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
13
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
14
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
15
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
16
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
17
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
18
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
19
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
20
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई

आसाराम बापू म्हणतो.... मी संत नाही गाढव आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 11:46 AM

स्वयंघोषित अध्यात्मगुरू आसाराम बापू अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गेल्या 4 वर्षांपासून जोधपूर तुरूंगात बंद आहे.

जोधपूर, दि. 15 - स्वयंघोषित अध्यात्मगुरू आसाराम बापू अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गेल्या 4 वर्षांपासून जोधपूर तुरूंगात बंद आहे. अखिल भारतीय अखाड़ा परिषदेने नुकतंच आसाराम बापूचं नाव ढोंगी बाबांच्या यादीत घेतलं आहे. या यादीत नाव आल्यामुळे आसाराम बापू चांगलाच संतापलाय. ढोंगी बाबांच्या यादीत नाव आल्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारताच आसाराम बापू भडकला आणि मी संत नाही गाढव आहे असं म्हणाला. 

तुरूंगातून कोर्टात आणताना पत्रकारांनी आसारामला तुम्ही स्वतःला कथा वाचक समजतात की संत हा प्रश्न विचारला. या फ्रश्नावर आासरामला राग अनावर झाला. मी संतही नाही की कथा वाचकही नाही मी तर गाढवांच्या श्रेणीत येतो असं आसारामने उत्तर दिलं. मात्र, यावेळी त्यांनी आखाडा परिषदेवर कोणत्याही प्रकारची टीका करण्याचं टाळलं आणि ते पुढे निघून गेले. 

16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापू गेल्या 4 वर्षांपासून जोधपूर तुरूंगात शिक्षा भोगत आहे. जोधपुर पोलिसांनी आसाराम बापूला 3 ऑगस्ट 2013 रोजी अटक केली होती.   

देशभरातील 14 ढोंगी बाबांची यादी जाहीर; आसाराम,राधे मां, राम रहिमची नावं यादीत, वाचा कोण आहेत 14 ढोंगी बाबा-अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशभरातील 14 भोंदू बाबांची यादी जाहीर केली आहे. रविवारी अलाहाबादमध्ये आखाडा परिषदेची बैठक झाली. या बैठकीनंतर देशातील 14 भोंदू बाबांची यादी जाहीर करण्यात आली.  अलाहाबादमध्ये सकाळी 11 वाजता ही बैठक झाली.  बैठकीनंतर आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी महाराज यांनी धर्माच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करणा-या 14 ढोंगी बाबांची यादी जाहीर केली. जीवे मारण्याची धमकी- या बैठकीच्या आधी परिषदेचे अध्यक्ष  महंत नरेंद्र गिरी महाराज यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.बैठकीत त्यांनी फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी येत असल्याचं सांगितलं. गेल्या तीन दिवसांपासून धमकी येत असल्याचं ते म्हणाले. धमकी देणा-याने आपण आसाराम बापूचा शिष्य असल्याचं सांगितलं असं ते म्हणाले. या प्रकरणी त्यांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संत उपाधी देण्याबाबतही निर्णय-यावेळी अखिल भारतीय अखाड़ा परिषदेने  'संत' उपाधी देण्यासाठी प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित व्यक्तीची संपूर्ण पडताळणी करुन त्याचं आकलन करून नंतरच संत ही उपाधी बहाल केली जाणार आहे. याद्वारे  गुरमीत राम रहीम सारख्या लोकांकडून होत असलेल्यी धर्माच्या नावाखालील फसवणुकीला आळा बसेल.  विश्व हिंदू परिषदेचे (विहिप) संयुक्त महासचिव सुरेंद्र जैन म्हणाले, एक-दोन भोंदू व्यक्तींमुळे सगळ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. त्यामुळे संत उपाधी देणयाआधी संपूर्ण पडताळणी केली जाणार आहे.    सरकारला पाठवणार यादी-  या ढोंगी बाबांची यादी सरकारला पाठवणार असल्याची माहिती आहे. जेणेकरून अशा ढोंगी बाबांविरोधात कारवाई केली जावी असा त्या मागचा उद्देश आहे.  दरम्यान या बैठकीपूर्वी नरेंद्र गिरी महाराज यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. बैठकीपूर्वी एक दिवस फोनवरुन ही धमकी देण्यात आली. याप्रकरणी त्यांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. धमकी देणारा व्यक्ती आपण आसाराम बापूचा शिष्य असल्याचं सांगत आहे. हे आहेत ढोंगी बाबा- - आसाराम बापू उर्फ आशुमल शिरमलानी

- सुखबिंदर कौर उर्फ राधे मां

-सच्चिदानंद गिरी उर्फ सचिन दत्ता

- गुरमीत राम रहीम सिंह

-ओमबाबा उर्फ विवेकानंद झा

-निर्मल बाबा उर्फ निर्मलजीत सिंह

- रामपाल

-आचार्य कुशमुनि

-वृहस्पति गिरी

-मलखान सिंह 

-इच्छाधारी भीमानंद उर्फ शिवमूर्ति द्विवेदी

-स्वामी असीमानंद

-ओम नमः शिवाय बाबा

-नारायण साईं