शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये ढील दिल्यानं आठवड्याभरात वाढले 3500 रुग्ण, केजरीवालांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 13:21 IST

CoronaVirus : चिंता करण्याची कोणतीही गोष्ट नाही. कोरोनानं मृत्यू होणाऱ्यांची संख्या कशी कमी होईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

नवी दिल्लीः कोरोनाचं थैमान दिवसेंदिवस वाढत असून, केंद्रासह अनेक राज्य सरकारे कोरोनाला थोपवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. कोरोना हा आज किंवा उद्या जाणारा आजार नाही. लॉकडाऊनमध्ये ढील दिल्यामुळे राजधानीत कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, आठवड्याभरात 3500 रुग्ण वाढले आहेत. परंतु चिंता करण्याची कोणतीही गोष्ट नाही. कोरोनानं मृत्यू होणाऱ्यांची संख्या कशी कमी होईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.कोरोना रुग्णावर उपचार करण्यास नकार देणाऱ्या हॉस्पिटलला 'कारणे दाखवा' नोटिस बजावली आहे. COVID19 च्या रुग्णांना अॅम्ब्युलन्सने कोविड हॉस्पिटलला पोहोचवणं हे रुग्णालयाचं कर्तव्य आहे. लॉकडाऊन शिथील केल्यामुळे दिल्लीत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. मात्र, जोवर मृत्यूदर किंवा गंभीर प्रकरणांची संख्या वाढत नाही, तोवर काळजीचं कारण नाही. दिल्लीतील सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधील मिळून 4,500 बेड्स तयार आहेत, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी दिली आहे.दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आजपर्यंत दिल्लीत 13 हजारांहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत, परंतु आतापर्यंत 6 हजारांहून अधिक लोक बरे झाले आहेत. दिल्लीतील सरकारी रुग्णालयात 3829  बेड आहेत, त्यापैकी बर्‍याच जणांना ऑक्सिजनची सुविधाही पुरविण्यात आली आहे. यापैकी दीड हजार बेड वापरण्यात आले आहेत, उर्वरित बेड्स रिकामी आहेत. आमच्याकडे दोनशेहून अधिक व्हेंटिलेटर आहेत, त्यापैकी 11 वापरले गेले आहेत. खासगी रुग्णालयांमधील 600 हून अधिक बेड्स कोरोनासाठी देण्यात आले आहेत. तर 2000 पेक्षा जास्त बेड खासगी रुग्णालयात राखीव ठेवण्यात आले आहेत. 

हेही वाचाCoronaVirus News: ब्रिटनमध्ये सप्टेंबर अन् अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये संपणार कोरोनाचा प्रभाव, अभ्यासात खुलासाभारताची डोकेदुखी आणखी वाढणार; नेपाळ सीमेवर रस्ता तयार करणार Coronavirus: कोणत्याही देशाला जमलं नाही 'ते' चीननं करून 'दाखवलं'; उचललं मोठं पाऊलमोदी सरकारनं तैवानच्या राष्ट्रपतींना दिला पाठिंबा अन् शुभेच्छा, चीन संतापला

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालcorona virusकोरोना वायरस बातम्या