CoronaVirus News: ब्रिटनमध्ये सप्टेंबर अन् अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये संपणार कोरोनाचा प्रभाव, अभ्यासात खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 04:04 PM2020-05-24T16:04:06+5:302020-05-24T16:21:02+5:30

CoronaVirus News: सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीच्या इनोव्हेशन लॅबच्या संशोधनानुसार ब्रिटनमधील कोरोनाचे संकट 30 सप्टेंबरपर्यंत टिकेल.

new study at singapore predicts coronavirus may end by november in america vrd | CoronaVirus News: ब्रिटनमध्ये सप्टेंबर अन् अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये संपणार कोरोनाचा प्रभाव, अभ्यासात खुलासा

CoronaVirus News: ब्रिटनमध्ये सप्टेंबर अन् अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये संपणार कोरोनाचा प्रभाव, अभ्यासात खुलासा

Next
ठळक मुद्देलोकांच्या मनात कोरोना विषाणूबद्दल बरेच प्रश्न आहेत. विशेषत: लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त असल्याने ही चिंता सर्वांनाच सतावते आहे. जगातील काही देशांमध्ये कोरोना व्हायरस किती काळ जगेल, याचा शास्त्रज्ञांनी अंदाज लावला आहे.सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीच्या इनोव्हेशन लॅबच्या संशोधनानुसार ब्रिटनमधील कोरोनाचे संकट 30 सप्टेंबरपर्यंत टिकेल.

लंडनः लोकांच्या मनात कोरोना विषाणूबद्दल बरेच प्रश्न आहेत. विशेषत: लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त असल्याने ही चिंता सर्वांनाच सतावते आहे. जगातील काही देशांमध्ये कोरोना व्हायरस किती काळ जगेल, याचा शास्त्रज्ञांनी अंदाज लावला आहे. सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीच्या इनोव्हेशन लॅबच्या संशोधनानुसार ब्रिटनमधील कोरोनाचे संकट 30 सप्टेंबरपर्यंत टिकेल.

संशोधकांच्या अभ्यासानुसार, यूएस(अमेरिका)मध्ये 11 नोव्हेंबरपर्यंत कोरोनाचा प्रभाव राहील, तर इटलीमध्ये तो 12 ऑगस्ट रोजी संपेल. त्याचबरोबर सिंगापूरला 19 जुलै रोजी कोरोना विषाणूपासून मुक्ती मिळेल. या सर्व तारखांची गणना वर्तमान परिस्थिती, संसर्ग दर आणि मृत्यूच्या आकडेवारीच्या आधारे केली  गेली आहे. या मानकांमध्ये बदल होऊ शकतात. तसेच तारीख बदलण्याचाही अंदाज आहे. हा अंदाज देखील महत्त्वपूर्ण आहे, कारण काही दिवसांपूर्वी तज्ज्ञांनी असा दावा केला होता की, यूकेमध्ये जूनपर्यंत कोरोनामुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण संपेल.

एसयूटीने या अंदाजांसह एक इशाराही दिला आहे. यानुसार 'मॉडेल्स आणि डेटा बराच जटील आहे आणि वेगवेगळ्या देशांच्या स्थितीनुसार बदलत आहेत. त्याच्याबद्दल स्पष्टपणे अंदाज लावणे कठीण आहे. असेही म्हटले आहे की, कोरोना संपण्याची तारीख ही शेवटची तारीख लक्षात घेऊन लोकांनी जास्त आनंदित होण्याची गरज नाहीय. अशा तारखांमुळे लोक बेजबाबदारपणे वागू लागतली आणि व्हायरस नियंत्रित करण्यात त्यांची म्हणावी तशी साथ मिळणार नाही. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी ब्रिटिश अधिकारी आलोक शर्मा म्हणाले की, ब्रिटनला कोरोनाची लस कधीच सापडली नाही. ते म्हणाले, "आमच्या शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांनंतरही आम्हाला कधीही यशस्वी कोरोना विषाणूची लस मिळू शकली नाही." 

हेही वाचा

CoronaVirus News : 31 मेनंतर लॉकडाऊन राहणार की उठणार?; उद्धव ठाकरे म्हणतात...

CoronaVirus News : लाखो कोटींची पॅकेज वाटली, पण हाती आलं काय?, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात

भारताची डोकेदुखी आणखी वाढणार; नेपाळ सीमेवर रस्ता तयार करणार 

Coronavirus: कोणत्याही देशाला जमलं नाही 'ते' चीननं करून 'दाखवलं'; उचललं मोठं पाऊल

Coronavirus : "माणसाच्या कामाक उद्या माणूसच येतलो"; खाकीतला वॉरियर्स कलेतून देतोय संदेश

दिल्लीच्या सरकारी जाहिरातीमध्ये सिक्कीमला दाखवला भारताचा शेजारी 'देश'; उडाली खळबळ

मोदी सरकारनं तैवानच्या राष्ट्रपतींना दिला पाठिंबा अन् शुभेच्छा, चीन संतापला

लडाखमध्ये तणाव! चीनने वाढवले पुन्हा सैनिक; भारतानं जवानांना धाडलं

Web Title: new study at singapore predicts coronavirus may end by november in america vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.