शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

कलम 370: जम्मूमध्ये 2G इंटरनेट सेवा सुरु तर काश्मीरात फोन सेवांवरील निर्बंध हटविले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 12:25 IST

काश्मीरात 17 लँडलाइन सेवा शनिवारपासून सुरु करण्यात आली आहे.

श्रीनगर - कलम 370 हटविल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेट, फोन सेवांवर निर्बंध लावण्यात आले होते. हळूहळू या सेवांवरील निर्बंध हटविण्यात येत आहेत. सोमवारपासून राज्यातील शाळा-कॉलेज उघडण्यात येणार आहेत. तर आजपासून इंटरनेट, फोनसेवा सुरु करण्यात आली आहे. जम्मूमध्ये 2 जी सेवा सुरु करण्यात आली आहे. तर काश्मीरमध्ये लँडलाइन सेवा सुरु करण्यात आली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी शुक्रवारी याबाबतीत संकेत दिले होते. 

काश्मीरात 17 लँडलाइन सेवा शनिवारपासून सुरु करण्यात आली आहे. राज्यातील 100 हून टेलिफोन एक्सचेंज सेवांमधील 17 ऑपरेटर्सना सुविधा सुरु करण्याची सूट दिली आहे. श्रीनगर जिल्हा, सिव्हिल लाइन्स, छावणी परिसर, विमानतळाजवळील सेवा सुरु करण्यात आली आहे. उत्तर काश्मीरात गुरेज, तंगमार्ग, उरी केरन, करनाह आणि तंगधार येथील सेवा सुरु करण्यात आली आहे. तर दक्षिण काश्मीरात काजीगुंड आणि पहलगाम या परिसरात फोन सेवा सुरु केली आहे. केंद्र सरकारने 5 ऑगस्टला कलम 370 हटविणे आणि जम्मू काश्मीर पूनर्रचना विधेयक मांडल्यापासून याठिकाणची मोबाईल आणि लँडलाइन फोन सेवा स्थगित करण्यात आली होती. 

काश्मीरातील 5 जिल्ह्यांवर आजही बंदी काश्मीरातील सुरक्षेचा विचार करता अद्याप 5 जिल्ह्यांमधील या सेवांवर बंदी कायम ठेवली आहे. त्याचसोबत सीआरपीएफ, जम्मू काश्मीर पोलीस, सैन्याचे जवान यांना अतिसंवेदनशील परिसरात तैनात ठेवण्यात आलं आहे. शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना मुख्य सचिव सुब्रमण्यम यांनी काश्मीर खोऱ्यात फोन सेवा शनिवारपासून सुरु करण्याचं जाहीर केलं होतं. राज्यातील 22 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यात परिस्थिती सर्वसामान्य असल्याची माहिती त्यांनी दिली होती. 

उधमपूरपासून जम्मूपर्यंत इंटरनेट सेवा सुरु शनिवारी मिळालेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरातील उधमपूर, रियासी, कठुआ, सांबा आणि जम्मू शहरांतील 2 जी इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे. त्याचसोबत या परिसरात कोणतेही निर्बंध लावण्यात आले नाहीत. काश्मीरमधील इंटरनेट सेवा सुरु करण्याचा निर्णय कायदा-सुव्यवस्था परिस्थिती पाहूनच निर्णय घेतला जाईल असं अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच ज्या लोकांना ताब्यात घेतलं आहे त्यांची सुटकाही परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर विचार करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरInternetइंटरनेटMobileमोबाइलArticle 370कलम 370