शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत कलम '370 पे चर्चा', शाळकरी विद्यार्थी गिरवणार धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 14:12 IST

जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतला होता.

जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतला होता. या घटनेची माहिती तरुण मुलांना समजावी यासाठी कलम 370 विषयची माहिती लवकरच शालेय अभ्यासक्रमात समावेश करणार असल्याचे वक्तव्य भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पुण्यातील जन जागरण सभेत केले आहे.

जे. पी. नड्डा म्हणाले की, आपल्या देशातील तरुण पिढीला कलम 370 हटविण्या संर्दभातील निर्णयाची माहिती असणं आवश्यक आहे. तसेच तरुण पिढीने नक्की काय घडले आणि आपण काय केले पाहिजे हे जाणून घेण्यासाठी देखील त्यांचा रस वाढला पाहिजे. त्यामुळे शालेय अभ्याक्रमात याचा समोवेश करण्याचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगतिले.

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतला होता.  प्रस्तावित विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले होते. यानंतर लोकसभेत कलम 370 वर वादळी चर्चा झाल्यानंतर हे विधेयक 351 विरुद्ध 72 मताधिक्याने पारित झाले होते. त्यानंतर केंद्र सरकारने जम्मू- काश्मीरमधील नागरिकांना देशातील इतर लोकांप्रमाणे अधिकार मिळणार असल्याचे सांगितले.  तसेच तेथील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत असून आता सरकारने जम्मू- काश्मीर आणि लडाखच्या विकासाची आखणी देखील सुरु केली आहे. त्यासाठी जम्मू- काश्मीरमध्ये लवकरच नोकरभरती सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केली होती.

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरSchoolशाळाEducationशिक्षण