शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! गर्दीमुळे ट्रेनमध्ये चढू न शकलेल्या प्रवाशांनी संपूर्ण क्रांती एक्सप्रेसची केली तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 10:14 IST

महाकुंभमेळ्यामुळे बिहारमधील अनेक स्थानकांवर मोठी गर्दी दिसून येत आहे.

प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यामुळे बिहारमधील अनेक स्थानकांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. याच दरम्यान आरा स्टेशनवरून एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये संपूर्ण क्रांती ट्रेनची तोडफोड होत असल्याचं दिसून येतं. एसी कोचची काचही फुटली. मिळालेल्या माहितीनुसार, आरा स्टेशनवर प्रचंड गर्दीमुळे तिकीट असलेले प्रवासी ट्रेनमध्ये चढू शकले नाहीत. कारण ट्रेनमध्ये आधीच प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आतून दरवाजे बंद केले होते.

संपूर्ण क्रांती ट्रेन आरा येथे २ मिनिटं थांबते. जेव्हा ट्रेन थांबली तेव्हा आत आधीच बसलेल्या प्रवाशांनी ट्रेनचे दरवाजा बंद केले होते. यामुळे ज्या प्रवाशांकडे तिकीट होते त्यांना ट्रेनमध्ये चढता आलं नाही. अशा परिस्थितीत काही प्रवाशांकडून ट्रेनची तोडफोड करण्यात आली.

ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी आणि तोडफोडीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर, दानापूर रेल्वे विभागाचे डीआरएम जयंत कुमार चौधरी आरा स्टेशनवर पोहोचले. त्यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनची पाहणी केली. यानंतर त्यांनी सांगितलं की, प्रवाशांची सुरक्षा रेल्वेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. यासाठी जर गाड्यांच्या थांब्याचा वेळ वाढवायचा असेल तर तो वाढवावा. त्यांनी आरपीएफ आणि व्यावसायिक कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश दिले आणि सांगितले की जर प्रवाशांना ट्रेनमध्ये जागा मिळत नसतील तर त्यांना त्यानंतर येणाऱ्या ट्रेनमध्ये बसण्याची परवानगी द्यावी.

या प्रकरणात, आरपीएफ निरीक्षक सुमन कुमारी यांनी सांगितलं की, रविवारी कुंभमेळ्याला जाण्यासाठी आरा येथून एक विशेष ट्रेन निघणार होती. त्याची नियोजित वेळ संध्याकाळी ७ वाजता आहे. पण ती ट्रेन रात्री ८:२० वाजता निघाली. डीआरएमने म्हटलं आहे की, जेव्हा जेव्हा कोणतीही ट्रेन येते तेव्हा प्रवाशांचे हित लक्षात घेऊन, गरज पडल्यास ती आणखी १० ते १५ मिनिटं थांबवावी.

बिहारहून पश्चिमेकडे जाणाऱ्या गाड्या अजूनही हाऊसफुल्ल आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रयागराजला जाण्यासाठी आरा रेल्वे स्थानकावर लोकांची मोठी गर्दी जमत आहे. परिस्थिती अशी आहे की, गाड्यांमध्ये गर्दी जास्त असल्याने लोकांना चढताना आणि उतरताना खूप अडचणी येत आहेत.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाBiharबिहारrailwayरेल्वे