शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सेना दले बोलत नाहीत, मोहीमच फत्ते करतात!

By admin | Updated: October 9, 2016 05:27 IST

सीमापार सर्जिकल स्ट्राइक्सवरून राजकीय जुगलबंदी पेटली असतानाच भारतीय हवाई दलाचे प्रमुख अरुप राहा यांनी ‘सेना दले बोलत नाहीत, मोहीम फत्ते करतात,’ अशा शब्दांत

हिंडोन हवाई तळ : सीमापार सर्जिकल स्ट्राइक्सवरून राजकीय जुगलबंदी पेटली असतानाच भारतीय हवाई दलाचे प्रमुख अरुप राहा यांनी ‘सेना दले बोलत नाहीत, मोहीम फत्ते करतात,’ अशा शब्दांत शनिवारी पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला. पाकिस्तानचे नाव ने घेता, कोणत्याही आव्हानाला चोख प्रत्युत्तर देण्यास लष्कर सज्ज असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. भारतीय हवाई दलाच्या ८४व्या स्थापना दिनानिमित्त उत्तर प्रदेशच्या गाजियाबाद जिल्ह्यातील हिंदोन हवाई तळावर आयोजित समारंभात राहा म्हणाले की, ‘या मुद्द्यावर देशात प्रचंड चर्चा झडत आहे. समाजाचा प्रत्येक घटक याबाबत आपले मत व्यक्त करीत आहे. मात्र, आम्ही याबाबत बोलणार नाही, केवळ करून दाखवू. देशाला हवी असलेली कामगिरी करून दाखविणे हेच सैन्याकडून अपेक्षित आहे, असे एअर चिफ मार्शल राहा यांनी सांगितले. भारतीय लष्कराने २९ सप्टेंबर रोजी केलेल्या सीमापार कारवाईवरून सध्या देशात राजकीय युद्ध पेटले आहे. सरकार या मोहिमेचा राजकीय लाभ उचलत असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अरुप राहा यांनी वरील उत्तर दिले. या वेळी भारतीय हवाई दलाच्या चित्तथरारक ‘एअर शो’ने सर्वच उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. स्वदेशी बनावटीच्या हलक्या लढाऊ विमानाने यंदा पहिल्यांदाच एअर शोमध्ये भाग घेतला होता. या विमानांनी अप्रतिम कसरती केल्या. त्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. (वृत्तसंस्था)कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी लष्कर तयार- समारंभात बोलताना राहा म्हणाले की, जगात सध्या प्रचंड उलथापालथ सुरू आहे. उरी आणि पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्यांनी आपण किती अडचणींच्या काळात जगत आहोत हे दाखवून दिले. कोणत्याही धोक्याला सामोरे जाण्यासाठी आम्ही स्वत:ला घडविणे सुरूच ठेवणार असून, कोणत्याही आव्हानाला चोख प्रत्युत्तर देण्यास आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत, असे राहा म्हणाले. पाकिस्तानच्या वाढत्या धोक्याबाबत छेडले असता ते म्हणाले की, कोणत्याही उपखंडीय धोक्याला तोंड देण्यासाठी लष्कर सज्ज आहे. राहा चिफ आॅफ स्टाफ कमिटीचेही अध्यक्ष आहेत.