शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
4
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
5
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
6
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
7
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
8
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
9
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
10
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
11
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
12
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
13
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
14
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
15
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
16
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
17
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
18
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
20
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
Daily Top 2Weekly Top 5

सैन्याने दिल्लीकडे कूच केले नव्हते - व्ही.के.सिंह

By admin | Updated: January 10, 2016 16:33 IST

सैन्याने दिल्लीच्या दिशेने कूच केले होते हा वरिष्ठ काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी केलेला आरोप केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के.सिंह यांनी रविवारी फेटाळून लावला.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १० - सैन्य दलाने २०१२ साली तत्कालीन केंद्र सरकारला कोणतीही पूर्वकल्पना न देता दिल्लीच्या दिशेने कूच केले होते हा वरिष्ठ  काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी केलेला आरोप केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के.सिंह यांनी रविवारी फेटाळून लावला. 
सध्या मनिष तिवारी रिकामे आहेत. त्यांच्याकडे काहीही काम नाही. या विषयावर माझे पुस्तक आहे. ते त्यांनी वाचावे. त्यातून त्यांच्या सर्व शंका दूर होतील असे व्ही.के.सिंह यांनी सांगितले. दिल्लीत शनिवारी एका कार्यक्रमामध्ये बोलताना मनिष तिवारी यांनी या घटनेचा उल्लेख केला. 
सैन्याने दिल्लीच्या दिशेने कूच केल्याचे चार एप्रिल २०१२ मध्ये इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिध्द झालेले ते वृत्त खरे होते. त्यावेळी मी संरक्षण खात्याच्या स्थायी समितीवर होतो. सैन्याने  दिल्लीच्या दिशेने कूच केले हे दुर्देवी आहे पण हे वृत्त खरे आहे. यावरुन मला आता वाद करायचा नाही असेही ते म्हणाले. 
विद्यमान केंद्रीय मंत्री व्ही.के.सिंह २०१२ मध्ये लष्करप्रमुख होते. त्यांचा  जन्मतारखेच्या मुद्यावरुन केंद्र सरकारबरोबर त्यावेळी वाद सुरु होता. १६ जानेवारी २०१२ च्या रात्री शेजारच्या हरणायामधून सैन्याची एक तुकडी केंद्र सरकारला कोणतीही पूर्वकल्पना न देता दिल्लीच्या दिशेने निघाली होती असे वृत्त चार एप्रिल २०१२ मध्ये इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिध्द झाले होते. हे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर व्ही.के.सिंह यांनी आरोप फेटाळून लावताना हे वृत्त मूर्खपणा असल्याचे म्हटले होते.