शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

आता मालगाडीत होणार नाही चोरी, सामानाच्या देखरेखीसाठी तैनात करणार सशस्त्र रक्षक दल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 10:53 AM

रेल्वेनं मालगाडीतल्या मालडब्यातील सामानाची सुरक्षा आणि चोरी रोखण्यासाठी पहिल्यांदाच सशस्त्र रक्षक दलाचे जवान तैनात करण्याला मंजुरी दिली आहे.

नवी दिल्लीः रेल्वेनं मालगाडीतल्या मालडब्यातील सामानाची सुरक्षा आणि चोरी रोखण्यासाठी पहिल्यांदाच सशस्त्र रक्षक दलाचे जवान तैनात करण्याला मंजुरी दिली आहे. सशस्त्र रक्षक दलाच्या जवानांना पूर्व रेल्वेच्या झोनमध्ये तैनात करण्यात येणार आहे. सहा महिन्यांनंतर याचा आढावा घेतला जाणार असून, त्यानंतर इतर झोनमध्ये जवानांना तैनात करण्याबाबत निर्णय होणार आहे. रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार सामानाची देखरेख करणं आणि चोरी रोखण्यासाठी सशस्त्र रक्षक दलाचे जवान तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर 2014मध्ये मालगाड्यांमध्ये सशस्त्र दलाचे जवान तैनात करण्याला परवानगी देण्यात आली होती. परंतु त्यांना शस्त्रास्त्र सोबत बाळगण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, मालगाडीमध्ये चोरीचे जास्त प्रकार समोर आलेले नाहीत, तरीसुद्धा उद्योग जगताच्या मागणीनुसार सशस्त्र दलाच्या जवानांना तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला.मालगाडीतून सामान पाठवणारे आणि प्राप्त करणाऱ्यांना लेखी स्वरूपात स्वाक्षरी असलेले दस्तावेज पुरवले जाणार आहे. तसेच त्या दस्तावेजावर सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या आणि सिक्युरिटी एजन्सीचं नाव देण्यात येणार आहे. तसेच मालगाडीमध्ये तैनात रक्षक केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कायद्याचं पालन करणार आहेत. आरपीएफ, जीआरपीएफ आणि पोलिसांना सुरक्षा एजन्सी वेळोवेळी या हालचालींची माहिती देणार आहेत.