शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अर्जून पुरस्काराचे ‘महाभारत’

By admin | Updated: August 21, 2014 09:30 IST

प्रतिष्ठेच्या अजरुन पुरस्कारांवरून महाभारत सुरू झाले असून, दिवसेंदिवस हा वाद विकोपाला जात आहे.

नवी दिल्ली : प्रतिष्ठेच्या अजरुन पुरस्कारांवरून महाभारत सुरू झाले असून, दिवसेंदिवस हा वाद विकोपाला जात आहे. हॉकी इंडियाचे महासचिव नरिंदर बत्र यांनी तर पुरस्कार समिती, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि क्रीडा मंत्रलयाविरुद्ध ‘एल्गार’ पुकारला.
अजरुन पुरस्कार निवड समितीने मंगळवारच्या बैठकीत 15 खेळाडूंच्या यादीत कुठलाही बदल करण्याची शक्यता फेटाळून लावली होती. दुसरीकडे सात हॉकीपटूंकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करीत बत्र यांनी आरटीआय दाखल करीत ‘आगीत तेल ओतले.’ या पुरस्कारासाठी अपात्र ठरविण्यात आलेला बॉक्सर मनोज कुमारनेही क्रीडा मंत्रलयाविरुद्ध न्यायालयात धाव घेतली. बत्र हे साईचे महासंचालक जी.जी. थॉमसन, क्रीडा सचिव अजित शरण व अजरुन पुरस्कार समितीत हॉकीचे तज्ज्ञ म्हणून समावेश असलेल्या अनुपम गुलाटीवर तोंडसुख घेण्याची एकही संधी सोडत नाहीत.
यंदा हॉकी इंडियाला मान्यता मिळवून देण्यातही मोठी भूमिका बजावली आहे.’ बत्र यांनी दाखल केलेल्या आरटीआयमध्ये थॉमसन आणि अजित शरण यांच्यावर देशात तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासावर किती खर्च झाला, अशी विचारणा केली असून, अजरुन पुरस्कारासाठी आलेल्या सर्व अर्जाची तपशीलवार माहिती क्रीडा मंत्रलयाला मागितली. 
कधी काळी हॉकी इंडियातून हकालपट्टी करण्यात आलेले अनुपम गुलाटी हॉकी विशेषज्ज्ञ कसे, असा सवाल करीत बत्र यांनी, गुलाटी यांनी सात हॉकीपटूंकडे दुर्लक्ष करण्यात मोलाची भूमिका बजावल्याचा आरोप केला. पुरस्कार निवड समितीची काल जी समीक्षा बैठक बोलवण्यिात आली होती, त्या बैठकीत बॉक्सर मनोजच्या नावावर फेरविचार होईल, अशी अपेक्षा होती; पण तसे न घडल्याने मनोजने कोर्टात धाव घेतली. एनआयएस पतियाळा येथील शिबिरात असलेला मनोज म्हणाला, ‘माङयासोबत अन्याय होणार नाही, असे साईच्या महासंचालकांकडून तसेच क्रीडा सचिवांकडून आश्वासन मिळाले होते. माङो नाव पुरस्कार यादीत येईल, अशी खात्री देण्यात आली होती; पण अखेर सर्व आश्वासने फोल ठरली. या गोष्टींचा माङयावर मानसिक परिणाम झाला.’ 
तथापि पुरस्कारासाठी बॉक्सर्सची जी नावे पाठविण्यात आली, त्यात सर्वाधिक गुण मनोजलाच होते. नरिंदर बत्र यांनी 19 ऑगस्टपासून सुरू होणा:या शिबिरास परवानगी नाकारल्याबद्दल धन्यवाद. भारताचा महिला हॉकी विकास कार्यक्रम खराब करण्यासाठी बद्दल केंद्रीय क्रीडामंत्रलय व साईचे आभार मानले.  
(वृत्तसंस्था)
 
4मीडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष कपिलदेव यांनी हे कोण बत्र? त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले काय? ते भारताकडून खेळले का? असा सवाल उपस्थित केला. 
 
4कपिल यांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह लावले. कपिल यांनी देशासाठी एकतरी खेळाडू घडवला काय, असा प्रतिप्रश्न करित ‘कपिल यांनी क्रिकेट किंवा अन्य खेळाडूंसाठी जर काही केले असेल तर लाईट विकण्याचेच काम केले आहे. 
 
हॉकी शिबिराला परवानगी नाकारली
4सरकारने राष्ट्रीय हॉकी शिबिराला परवानगी नाकारताच हॉकी इंडियाचे महासचिव नरिंदर बत्र यांनी क्रीडा सचिव अजित शरण आणि साईचे महासंचालक जी. जी. थॉमसन यांच्याविरुद्ध आरटीआय दाखल केली आहे.
4राष्ट्रीय महिला हॉकी संघाचे शिबिर मंगळवारपासून भोपाळमध्ये सुरू होणार होते; पण सरकारने परवानगी दिलेली नाही. यावर चिडलेल्या बत्र यांनी अजित शरण आणि थॉमसन हे पदावर आल्यापासून देशात आणि देशाबाहेर त्यांच्यावर शासकीय खर्च किती झाला, अशी माहिती मागितली आहे. 
4क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्तक्षेपाची मागणी करीत ते पुढे म्हणाले, ‘तुमच्या अधिका:यांसोबत काम करणो कठीण झाले आहे. हे अधिकारी काहीही ऐकून घेण्यास तयार नाही. ते सांगतील ती पूर्व दिशा, अशा थाटात काम सुरू असल्याने खेळांचा दम कोंडतो आहे.’