शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मोदींविरुद्धची याचिका हायकोर्टात दाखल

By admin | Updated: September 28, 2015 23:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार कारवाई केली जावी

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार कारवाई केली जावी, अशी मागणी करणारी एक याचिका गुजरात उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे.आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते निशांत वर्मा यांनी ही याचिका केली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री व भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. अहमदाबादच्या रानिप भागातील एका मतदान केंद्रात मतदान करून बाहेर आल्यानंतर मोदी यांनी ‘कमळ’ हे भारतीय जनता पार्टीचे निवडणूक चिन्ह हातात घेऊन आपल्या मोबाईलवर एक सेल्फी छायाचित्र काढले होते. मतदान केंद्राबाहेर त्यांनी पत्रकार परिषदही घेतली होती.मोदींची ही कृती त्यावेळी सर्व वृत्तवाहिन्यांनी ‘लाईव्ह’ प्रक्षेपित केली होती. मतदान केंद्राच्या ५००मीटर परिसरात राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह प्रदर्शित करणे हा आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेत गुजरात पोलिसांना यासंदर्भात ‘एफआयआर’ नोंदविण्याचा आदेश दिला होता.त्यानुसार पोलिसांनी त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या मोदींविरुद्ध ‘एफआयआर’ नोंदविला. मात्र नंतर पोलिसांनी तक्रारीत तथ्य नसल्याचा ‘क्लोजर रिपोर्ट’ सादर केला. तो मान्य करून दंडाधिकाऱ्यांनी प्रकरण बंद केले. वर्मा यांनी दंडाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात पुनरिक्षण याचिका केली आहे. मोदींनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचे व्हिडिओ चित्रीकरणात स्पष्ट दिसते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांची याचिका सविस्तर तपासून पाहण्याची गरज आहे, असे नमूद करून उच्च न्यायालयाने ती सुनावणीसाठी दाखल करून घेतली. (वृत्तसंस्था)