शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

आसाराम प्रकरणातील आणखी एका साक्षीदारावर कोर्टात चाकूहल्ला

By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST

जोधपूर : आसाराम बापूविरुद्धच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील एका साक्षीदारावर शुक्रवारी भर न्यायालयात चाकूहल्ला करण्यात आला. साक्षीदारावर चाकूहल्ला करणाऱ्याने आपण आसाराम बापूचा भक्त असल्याचा दावा केला आहे. याआधी आसारामविरुद्ध साक्षीदार बनलेल्या दोन जणांची हत्या करण्यात आली , हे येथे उल्लेखनीय.

जोधपूर : आसाराम बापूविरुद्धच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील एका साक्षीदारावर शुक्रवारी भर न्यायालयात चाकूहल्ला करण्यात आला. साक्षीदारावर चाकूहल्ला करणाऱ्याने आपण आसाराम बापूचा भक्त असल्याचा दावा केला आहे. याआधी आसारामविरुद्ध साक्षीदार बनलेल्या दोन जणांची हत्या करण्यात आली , हे येथे उल्लेखनीय.
आसाराम बापूच्या आश्रमात सेवादार राहिलेला राहुल सचान हा पोलीस बंदोबस्तात न्यायालयात साक्ष देण्यासाठी आला होता. साक्ष दिल्यानंतर पोलीस बंदोबस्तात तो पोलीस जीपमध्ये बसत असताना त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला, अशी माहिती फिर्यादी पक्षाचे वकील पी. सी. सोळंकी यांनी दिली. सत्यनारायण असे हल्लेखोराचे नाव आहे. त्याने राहुलच्या कमरेत चाकू खुपसला. राहुलला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ला केल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सत्य नारायणला पोलिसांनी अटक केली.
एक महिन्यापूर्वी ११ जानेवारीला उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात आसारामविरुद्धच्या खटल्यातील प्रमुख साक्षीदार अखिल गुप्ता याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. गुप्ता हा आसारामचा स्वयंपाकी व खासगी मदतनीस होता. गुप्ताच्या हत्येपूर्वी अमृत प्रजापती या आसारामच्या माजी सेवकाची गेल्या वर्षी जूनमध्ये गुजरात येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
सुरतच्या दोन बहिणींनी आसाराम व त्याचा पुत्र नारायण साई या दोघांवर बलात्काराचा आरोप लावला आहे. या प्रकरणात राहुल हा प्रमुख साक्षीदार आहे आणि आसाराम व नारायण साई हे दोघे महिलांना आपल्या आश्रमात आणून त्यांच्यावर कसे लैंगिक अत्याचार करीत होते, हे त्याने न्यायालयात सांगितले आहे. आसाराम बापू ऑगस्ट २०१३ पासून तुरुंगात आहे. (वृत्तसंस्था)