सहायक पोलीस आयुक्तांच्या नियुक्त्या जाहीर
By Admin | Updated: July 8, 2015 23:45 IST2015-07-08T23:45:09+5:302015-07-08T23:45:09+5:30
पुणे : राज्यातील 8 सहायक पोलीस आयुक्तांच्या नियुक्तांचा आदेश गृह विभागाने बुधवारी जाहीर केला. दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) पुणे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांना नव्यानेच निर्माण करण्यात आलेल्या एटीएसच्या पुणे विभागाच्या सहायक आयुक्तपदी नेमण्यात आले आहे.

सहायक पोलीस आयुक्तांच्या नियुक्त्या जाहीर
प णे : राज्यातील 8 सहायक पोलीस आयुक्तांच्या नियुक्तांचा आदेश गृह विभागाने बुधवारी जाहीर केला. दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) पुणे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांना नव्यानेच निर्माण करण्यात आलेल्या एटीएसच्या पुणे विभागाच्या सहायक आयुक्तपदी नेमण्यात आले आहे. सतीश शंकरराव पाटील यांची औरंगाबाद येथून, पी. बी. लोखंडे यांची सीआयडीमधून, किशोर नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक पथकामधून, तर वैशाली जाधव - माने, जी. एस. माडगुळकर यांची औरंगाबादहून सीआयडीमधून पुणे शहरामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. तर औरंगाबाद एटीएसचे उपअधिक्षक अरुण रामधन चव्हाण यांनी बृहन्मुंबई येथे बदली झाली आहे. सीआयडी येथून शामराव भिकाजी निपुंगे यांची ठाणे शहराच्या सहायक पोलीस आयुक्तपदी नेमणूक झाली आहे.