शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

अनिल देशमुख....

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

युती शासनातर्फे जिल्‘ावर अन्याय

युती शासनातर्फे जिल्ह्यावर अन्याय
अनिल देशमुख : वार्षिक योजनेच्या निधीत केवळ ११ टक्के वाढ
नागपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे नागपुरातील तसेच अर्थमंत्री विदर्भाचे असतानादेखील भाजप-शिवसेना युती शासनाकडून नागपूर जिल्ह्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीत केवळ ११ टक्क्यांनी वाढ केली असून ते जिल्ह्यावर अन्यायकारक असल्याचेही ते म्हणाले.
जिल्ह्याच्या विकासासाठी दरवर्षी जिल्हा वार्षिक योजनेतून राज्य शासनाच्यावतीने विविध कामांसाठी निधी दिला जातो. या योजनेच्या माध्यमाने जिल्ह्यात विकास कामे केली जातात. राज्यात आघाडी सरकार असताना या निधीमध्ये दरवर्षी वाढ करण्यासाठी आमचा प्रयत्न राहीला. त्यामुळेच सन २०१०-११ मध्ये हा निधी ११७ कोटी रुपये होता. यात ३७ टक्क्यांनी वाढ करून हा निधी १६० कोटी करण्यात आला होता. तसेच २०१४-१५ मध्ये त्यात ३० टक्के वाढ करून १७५ कोटींवरून २२५ कोटीवर नेण्यात आली, अशी माहिती त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. परंतु भाजन-शिवसेनेचे शासन राज्यात आल्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या. मुख्यमंत्री नागपुरातील तसेच अर्थमंत्री विदर्भातील असताना नागरिकांच्या अपेक्षांवर पाणी फेरण्यात आल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. नुकत्याच नागपूर येथील जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या निधीत केवळ ११ टक्के वाढ करून २२५ कोटीवरून हा निधी केवळ २५० कोटी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील शेतकरी विविध नैसर्गिक संकटात सापडले आहेत. पॅकेजच्या नावाखाली युती शासन शेतकऱ्यांच्या तोंडांना पाने पुसण्याचे काम करीत आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यात येत असल्याचे देशमुख म्हणाले. (प्रतिनिधी)