शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
3
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
5
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
6
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
7
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
8
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
9
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
10
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
11
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
12
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
13
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
14
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
15
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
16
संपादकीय: या कॅन्सरला ‘नीट’ रोखा, तीन दशकांत अक्षरशः खोबरे झाले
17
भारत-पाकमधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कुणाचे? 
18
राजनैतिक थकव्याने एकाकी इराणला भारताचा(च) आधार!
19
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
20
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
Daily Top 2Weekly Top 5

"...तर पंजाब पेटून उठेल", मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 09:22 IST

सतलज-यमुना कालव्याचे काम पूर्ण झाल्यास पंजाब पेटून उठेल आणि राष्ट्रीय सुरक्षेचा एक मोठा प्रश्न निर्माण होईल असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे.

चंदिगड - पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्र सरकारला गंभीर इशारा दिला आहे. सतलज-यमुना कालव्याचे काम पूर्ण झाल्यास पंजाब पेटून उठेल आणि राष्ट्रीय सुरक्षेचा एक मोठा प्रश्न निर्माण होईल असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. यांसदर्भात एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी त्यांनी असा इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी पंजाबमधील या परिस्थितीचा राजस्थान आणि हरियाणावरही परिणाम होईल असं म्हटलं आहे. 

पंजाब आणि हरियाणा सरकारमध्ये मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावतही उपस्थित होते. हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने बघितला गेला पाहिजे असं यावेळी अमरिंदर सिंग म्हणाले. तुम्ही जर सतलज-यमुना कालव्याच्या मुद्यावर पुढे जात असाल तर पंजाब पेटून उठेल आणि ही राष्ट्रीय समस्या बनेल. पंजाबमध्ये उद्भवणाऱ्या परिस्थितीचा परिणाम हरियाणा आणि राजस्थानवरही होईल. मात्र, ही बैठक सकारात्मक होती असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. 

पंजाब सरकार या कालव्याच्या प्रश्नावर असलेल्या आपल्या भूमिकेवर पूर्णपणे ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे. तर पहिल्यांदाच या विषयावर मोकळेपणाने चर्चा झाली असं हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी बैठकीनंतर सांगितलं आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी देखील उपस्थिती लावली होती. 

सतलज-यमुना लिंक कालव्याचा प्रश्न हा तब्बल 44 वर्ष जुना आहे. मार्च 1976  मध्ये केंद्र सरकारने पंजाबच्या 7,2 दशलक्ष घनफूट पाण्यापैकी 3.5 दशलक्ष घनफूट पाणी देण्याची अधिसूचना जारी केली होती. यानंतर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पतियाळा येथील सतलज यमुना लिंक कालव्याचे उद्घाटन केले. त्यानंतर राजीव गांधी सरकारमध्ये कालवा बांधण्याच्या निर्णयावर सहमती झाली होती. पण हा निर्णय करारानुसार अंमलात आलेला नाही. यामुळे हरियाणा सरकारने 1996 मध्ये सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : तंत्रज्ञानाची कमाल! आता चेहऱ्यावर मशीन लावणार मास्क, Video तुफान व्हायरल

"काँग्रेसने 70 वर्षांत काय केलं?, असा प्रश्न विचारत शहा एम्समध्ये उपचारासाठी दाखल"

CoronaVirus News : आनंदाचा 'चौकार'! कोरोनाच्या संकटात आशेचा किरण, 'या' गोष्टींमुळे देशाला मोठा दिलासा

CoronaVirus News : कर्तव्यनिष्ठेला सलाम! खेड्यापाड्यात पायी प्रवास करून 'हे' डॉक्टर्स करताहेत रुग्णांवर उपचार 

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यास मुलाने दिला नकार, शेवटी...

धक्कादायक! तब्बल 4 महिने आईच्या मृतदेहाजवळ बसून होती मुलगी

CoronaVirus News : देशात पहिल्यांदाच कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहाचं शवविच्छेदन, महत्त्वाची माहिती येणार समोर

बापरे! ...अन् उपमुख्यमंत्र्यांच्या बहिणीने घेतला दुकानदाराचा चावा, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

टॅग्स :PunjabपंजाबHaryanaहरयाणाWaterपाणी