CoronaVirus News : आनंदाचा 'चौकार'! कोरोनाच्या संकटात आशेचा किरण, 'या' गोष्टींमुळे देशाला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 03:35 PM2020-08-18T15:35:52+5:302020-08-18T15:47:59+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात मोठा दिलासा मिळाला आहे. देशाने आनंदाचा चौकार लगावला आहे.

देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 27,02,743 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 51,797 लोकांना जीव गमवावा लागला आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 55,079 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 876 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत.

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना दिलासादायक माहितीही समोर येत आहे. कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

अनेकांनी कोरोनाची लढाई जिंकली असून कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. कोरोनाच्या संकटात मोठा दिलासा मिळाला आहे. देशाने आनंदाचा चौकार लगावला आहे.

देशात चाचण्यांचं वाढवण्यात आलेलं प्रमाण आणि आयसोलेशन यामुळे रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच कोरोनातून ठिक होण्याचे प्रमाण वाढत आहे.

कोरोनाग्रस्तांवर देशातील अनेक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत्यू दरात सातत्याने घट होत आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र देशातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील परिस्थिती आता सुधारते आहे.

देशात कोरोनाचा मृत्यू दर 1.92 टक्के आहे. तसेच जगातील सर्वात कमी मृत्यू दर असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे.

तब्बल 19,77,779 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. उपचारानंतर त्यांनी कोरोनाचं युद्ध जिंकलं आहे. देशाचा रिकव्हरी रेट 73 टक्क्यांवर गेला आहे.

दिल्लीचा रिकव्हरी रेट हा सर्वात जास्त आहे. तर महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांचा रिकव्हरी रेट हा इतर राज्यांच्या तुलनेत थोडा कमी आहे.

कोरोना चाचण्यांच्या संख्येत मोठी वाढ करण्यात आली आहे. भारतात गेल्या 24 तासांत 8.97 लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत.

भारतात कोरोनाच्या चाचण्यांच्या संख्येने नवा रेकॉर्ड केला आहे. सुरुवातीला कमी चाचण्या केल्या जात होत्या. मात्र आता त्यामध्ये वाढ झाली आहे.

देशात कोविड टेस्टिंग लॅबची संख्या देखील वाढत आहे. आतापर्यंत देशात तब्बल 3,0941,264 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात कोरोनाचा पॉझिटिव्ह रेट स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. तसेच गेल्या 24 तासांत तो 8.81% होता.

सोशल डिस्टंसिंग, होम आयसोलेशन, क्वारंटाईन, मास्कच्या मदतीने योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. एका हिंदी वेबसाईने याबाबतचे वृत्त दिले आहे.

जगभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.