अमित शहांचा सांगली, सातारा,कोल्हापूर दौरा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 16:23 IST2019-01-21T16:21:42+5:302019-01-21T16:23:46+5:30

भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा सांगली सातारा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. अमित शहा ये येत्या 24 जानेवारी रोजी  सांगली, सातारा आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार होते.

Amit Shaha's Sangli, Satara & Kolhapur Visit canceled | अमित शहांचा सांगली, सातारा,कोल्हापूर दौरा रद्द

अमित शहांचा सांगली, सातारा,कोल्हापूर दौरा रद्द

नवी दिल्ली - भाजपाध्यक्षअमित शहा यांचा सांगली सातारा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. अमित शहा ये येत्या 24 जानेवारी रोजी  सांगली, सातारा आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार होते. मात्र नुकत्याच झालेल्या स्वाइन फ्लूमधून ते पूर्णपणे सावरलेले नाहीत. त्यामुळे अमित शहा यांनी हा दौरा रद्द केल्याचे समजते. 

भाजपाध्यक्ष अमित शहा यांना गेल्या बुधवारी स्वाइन फ्लूची लागण झाल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, प्रकृतीत सुधारणा झाल्याने अमित शहा यांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र ते आजारपणातून पूर्णपणे सावरलेले नाहीत, त्यामुळे त्यांचा आगामी   सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. 

Web Title: Amit Shaha's Sangli, Satara & Kolhapur Visit canceled