शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

ध्वजारोहण करताना अमित शहांकडून पडला 'तिरंगा', काँग्रेस बोलली हे काय देश सांभाळणार ?  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 12:15 PM

देशभरात आज 72व्या स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष केला जातोय.

नवी दिल्ली- देशभरात आज 72व्या स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावून देशाला संबोधित केलं आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शाहांनीही पक्ष कार्यालयात तिरंगा फडकावला आहे. परंतु तिरंगा फडकवत असताना अमित शाहांबरोबर एक घटना घडली. तिरंगा फडकावण्यासाठी जेव्हा त्यांनी दोरी खेचली होती, त्यावेळी अचानक तिरंगा खाली पडला. त्यानंतर काँग्रेसनं त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत अमित शहांवर निशाणा साधला.व्हिडीओ ट्विट करत काँग्रेस म्हणाली, ज्यांना देशाचा झेंडा सांभाळता येत नाही, ते देश कसा सांभाळणार आहेत ?, 50 वर्षांहून अधिक काळ तिरंग्याचा तिरस्कार केला नसता, तर ध्वजाचा असा अपमान झाला नसता. दुस-यांना देशभक्तीचं सर्टिफिकेट वाटणा-यांना राष्ट्रगीताचा अर्थ तरी माहीत आहे का?, असा प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं भाजपाचे नेते, केंद्रीय मंत्र्यांनी स्वतःच्या निवासस्थान, पक्ष कार्यालयात ध्वजारोहण केलं आहे.केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सकाळी स्वतःच्या घराबाहेर तिरंगा फडकावला आहे. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात तिरंगा फडकावला आहे. या दरम्यान राहुल गांधी यांनी पांढरी टोपी आणि कूर्ता, पायजमा परिधान केला होता. राहुल गांधी तिरंगा फडकावत असताना त्या ठिकाणी सोनिया गांधींसह इतर नेते उपस्थित होते. 

टॅग्स :Amit Shahअमित शाह