शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाह यांचे शीर कापून टेबलावर ठेवायला हवे; TMC खासदार महुआ मोइत्रा यांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 14:07 IST

महत्वाचे म्हणजे, बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आक्षेपार्ह विधानाचे प्रकरण जोर धरत असतानाच, आता हे प्रकरणही समोर आले आहे.

भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्यावरून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा वादात सापडल्या आहेत. यासंदर्भात, मोइत्रा यांनी अमित शाह यांचे 'शीर कापण्या'संदर्भात भाष्य केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. महत्वाचे म्हणजे, बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आक्षेपार्ह विधानाचे प्रकरण जोर धरत असतानाच, आता हे प्रकरणही समोर आले आहे.

यासंदर्भात बंगाल भाजपने म्हटले आहे की, "जेव्हा महुआ मोइत्रा गृहमंत्र्यांचे शीर कापण्यासंदर्भात भारष्य करतात, तेव्हा ते टीएमसीची हताशा आणि हिंसेची संस्कृती दर्शवते. ज्यामुळे बंगालची छबी खराब होत आहे आणि राज्याला मागे नेत आहे." पक्षाने एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे, ज्यात मोइत्रा पत्रकारांसोबत बोलताना दिसत आहेत.

पंतप्रधान  मोदींसंदर्भात भाष्य करणाऱ्याला अटक - बिहारमधील दरभंगा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या युकवकाला बिहार पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे नाव मोहम्मद रिजवी उर्फ ​​रजा असे आहे. तो दरभंगामध्येच राहतो. त्याने विरोधकांच्या मतदार हक्क यात्रेदरम्यान पंतप्रधान मोदींसंदर्भात अपशब्द वापरले होते. यावरून राजकीय वातावरणही तापले होते. यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. 

खरेतर, बिहार निवडणुकीच्या तोंडावरच विरोधी पक्ष मतदार हक्क यात्रेचे आयोजित करत आहेत. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या आहेत. बुधवारी (२७ ऑगस्ट) दरभंगा येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या रॅलीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईबद्दल अपशब्द वापरले गेले होते. मात्र, यावेळी राहुल अथवा तेजस्वी व्यासपीठावर उपस्थित नव्हते. या घटनेचा व्हिडिओ  देखील सोशल मीडियावरही शेअर करण्यात आला आहे.

टॅग्स :Mahua Moitraमहुआ मोईत्राTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपाAmit Shahअमित शाह