शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

कोरोना संकटात मुख्यमंत्र्यांचा अनोखा विक्रम; काँग्रेस खासदारानं खोचकपणे केलं अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 5:25 PM

coronavirus कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा विक्रम मोडीत

भोपाळ: गेल्या महिन्यात घडलेल्या मोठ्या नाट्यमय घडामोडींनंतर मध्य प्रदेशात भाजपाला सत्ता मिळाली. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर २० पेक्षा अधिक आमदारांनी राजीनामे दिले. त्यामुळे काँग्रेस सरकार कोसळलं. यानंतर पुन्हा एकदा भाजपा नेते शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अद्याप एकाही आमदारानं मंत्रिपदाची शपथ न घेतल्यानं चौहान सध्या एकटेच राज्याचा गाडा हाकत आहेत. काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेणाऱ्या ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काही दिवसांपूर्वीच गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. काँग्रेस सरकारमध्ये मंत्री असलेल्या आणि राजीनामा देऊन पक्षातून बाहेर पडलेल्या सहा जणांना मंत्री करण्यात यावं, अशी मागणी सिंधिया यांनी शहा यांच्याकडे केल्याचं समजतं. यावरुन अद्याप तरी कोणताही तोडगा निघाला नसल्याचं दिसतं आहे. त्यामुळे चौहान कॅबिनेटशिवाय २५ दिवस मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. त्यांच्या नावावर एक अनोखा विक्रमदेखील जमा झाला आहे.कोरोनाचं संकट असल्यानं गेल्या महिन्यात अतिशय साधेपणानं चौहान यांचा शपथविधी संपन्न झाला. २३ मार्चला त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अद्याप तरी त्यांचं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेलं नाही. गेल्या २५ दिवसांपासून ते एकटेच राज्यशकट हाकत आहेत. आधी हा विक्रम कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नावावर होता. त्यांनी कॅबिनेटशिवाय २४ दिवस राज्य कारभार केला होता. आता चौहान यांनी त्यांचा विक्रम मोडला आहे.काँग्रेसचे राज्यसभा सदस्य विवेक तनखा यांनी यावर भाष्य करणारं एक ट्विट केलं आहे. 'अभिनंदन शिवराजजी. मध्य प्रदेशात अंधकारमय स्थिती असताना तुम्ही कॅबिनेटशिवाय सर्वाधिकत दिवस मुख्यमंत्री म्हणून राहण्याचा विक्रम केला आहे. याआधी हा विक्रम कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नावे होता. तुम्हा दोघांना दलबदलूंमुळे चौथ्यांदा मुख्यमंत्री होता आलं,' असा खोचक टोला तनखा यांनी लगावला आहे.

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेYeddyurappaयेडियुरप्पाBJPभाजपाcongressकाँग्रेसAmit Shahअमित शहा